Monday , September 21 2026
Breaking News

अनगोळ येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

बेळगाव : अनगोळ बाबली गल्ली येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीने रविवारी मुला मुलींसाठी एक दिवसीय उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला मुला मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अनगोळसह, भाग्यनगर, चन्नमा नगर, गणेशपुर, शहापूर, शास्त्रीनगर,टिळकवाडी, वडगाव, पिरनवाडी आणि यमकनमर्डी यासह विविध ठिकाणाहून एकूण 76 मुला-मुलींनी शिबिरात भाग घेतला होता. शिबिरात सहभागी झालेल्या मुला मुलींसाठी अनेक प्रकारचे खेळ आयोजित करण्यात आले होते. खेळाबरोबरच जीवन मूल्ये त्याचबरोबर जीवनात संस्कारांचे महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली.
शिबिरार्थीनी आपल्या विविध प्रकारच्या कलेचे प्रदर्शनही यावेळी सादर केले. शिबिराप्रसंगी मातृ दिवसही साजरा करण्यात आला.यावेळी मुला-मुलींनी आपल्या आईसाठी सुंदर प्रकारची शुभेच्छापत्र बनविली. शिबिराचे आयोजन विद्या बहन यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. यावेळी महेश नाईक, मनोहर भाई, शोभा बहन, भारती बहन, आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *