Sunday , July 26 2026
Breaking News

युवकांनी मैदानी खेळांचे जतन करावे : सहकाररत्न उत्तम पाटील

Spread the love

 

अरिहंत चषक हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात मोबाईल आणि दूरचित्रवाणीमुळे मैदानी खेळांकडे युवकांनी पाठ फिरवली आहे. पारंपरिक खेळांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अरिहंत उद्योग समूहाने नेहमीच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले असून क्रिकेट, कुस्ती, कबड्डी आणि व्हॉली-बॉलसारख्या स्पर्धांना मोठ्या बक्षिसांच्या माध्यमातून पाठबळ दिले आहे. भविष्यातही भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मत सहकार रत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.
उत्तम पाटील म्हणाले, निपाणीतील श्री बालवीर स्पोर्ट्स क्लबने राष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू घडवून शहराचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले आहे. स्पर्धाद्वारे देशभरातील उत्कृष्ट
खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी निपाणीकरांना मिळवून दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण करणाऱ्या बालवीर स्पोर्ट्सचा अभिमान असल्याचे सांगितले.

निपाणी येथील अशोकनगर मधील बालवीर क्लबच्या मैदानावर आयोजित केलेल्या ‘अरिहंत चषक व्हॉलीबॉल लीग स्पर्धे’चे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार सुभाष जोशी होते.
क्लबचे उपाध्यक्ष प्रा. शिवाजी मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी मैदानाची पूजन व स्पर्धेचे उद्घाटन उत्तम पाटील यांच्याहस्ते झाले. स्पर्धेतील सहा संघांचे प्रायोजक टाऊन प्लॅनिंगचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील, प्रतिक शाह, सूरज राठोड, पपूपावले, विजय हाटवळ व सोमनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडू मारीया सुतार यांच्यासह मान्यवरांचा क्लबचे अध्यक्ष पुष्कर तारळे यांनी सत्कार केला.
पहिल्या सामन्यात राजमणी ट्रॅव्हल्सने सूरज राठोड वॉरियर्सचा २५-२३ आणि २५-१७ असा पराभव करत विजयी सलामी दिली. पंच म्हणून दत्ता ढंगे आणि दीपक चव्हाण यांनी काम पाहिले
यावेळी रवींद्र शिंदे, प्रा. आर. के. दिवाकर, अजय जाधव, ओंकार शिंदे, अवधूत शेडगे, दीपक बगाडे, प्रशांत नाईक, दिलीप पठाडे, निरंजन पाटील, आकाश खखवर, विनायक वडे यांच्यासह क्रीडाप्रेमी उपस्थित होते. प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. भालचंद्र आजरेकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *