Monday , September 21 2026
Breaking News

बेळगावला कर्नाटकचा अविभाज्य भाग घोषित करण्याच्या ठरावाची मागणी : महानगरपालिकेच्या बैठकीपूर्वी कन्नड संघटनांचा हायड्रामा

Spread the love

 

बेळगाव : बेळगावला कर्नाटकचा अविभाज्य भाग घोषित करणारा ठराव आजच्या महापालिका बैठकीत सर्वसाधारण सभेत मंजूर करावा, या मागणीसाठी कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी महानगरपालिके समोर आंदोलन केले.

कन्नड समर्थक संघटनांनी महानगरपालिकेत बेळगावला कर्नाटकचा अविभाज्य भाग घोषित करणारा ठराव मंजूर करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र एकीकरण समितीने ठराव मंजूर करण्यास विरोध केला आहे.

कर्नाटक समर्थक ठराव मंजूर करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन आधीच सुरू झाले आहे. सत्ताधारी भाजपला स्पष्ट बहुमत असूनही ठराव करत नसल्याच्या आरोपावरून बेळगाव महानगरपालिकेसमोर गोंधळ सुरू झाला.  बैठकीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कन्नड कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले आहे. सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डीसीपींच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *