Monday , September 21 2026
Breaking News

शिवाजीनगरमधील पाण्याचा दाब वाढविण्यासाठी नागरिकांचे नगरपालिका आयुक्तांना निवेदन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात २४ तास पाणी योजना कार्यान्वित होऊनही शिवाजीनगर सहाव्या गल्ली परिसरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्याची टंचाई भासत आहे. याबाबत बऱ्याचदा पाणीपुरवठा विभागाला कळवूनही त्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे अखेर अंबाबाई मंदिर परिसरातील कुटुंबीयांनी बुधवारी (ता.१३) नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना निवेदन देऊन पाण्याचा दाब वाढविण्याची मागणी केली.
निवेदनातील माहिती अशी, काही महिन्यापासून या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरातील कुटुंबांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. याबाबत पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कळवूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग आणि आयुक्तांनी तात्काळ या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन हॉल्वची व्यवस्था करण्यासह पाण्याचा दाब वाढवून नागरिकांची गैरसोय टाळण्याची मागणी केली आहे. आयुक्त गणपती पाटील यांनी निवेदन स्वीकारून शिवाजीनगर परिसरातील पाण्याचे पाहणी करून योग्य ती उपायोजना करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी नगरसेवक ॲड. संजय चव्हाण, सुनील सुगते, संगीता सुगते, दिलीप पटेल, सिंधू खोत, सुवर्णा डावरे, अमोल चौगुले, जयश्री चौगुले, शितल पाथरोट, गंगुबाई पाथरोट, दगडू कांबळे, नरेंद्र बलुगडे, इंदुबाई संकपाळ, एस. एस. सरकवास, डी. एस. पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *