Monday , September 21 2026
Breaking News

मच्छे येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार समारंभ व मार्गदर्शन कार्यक्रम

Spread the love

 

मच्छे : श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मच्छे यांच्या वतीने मच्छे गावातील मराठी, इंग्रजी व कन्नड माध्यमातील दहावी उत्तीर्ण तसेच विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

तसेच विद्यार्थ्यांसाठी “दहावीनंतर काय?” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सोमवार दिनांक 18 मे 2026 रोजी सायंकाळी ठीक 6.00 वाजता सप्तपदी मंगल कार्यालय, मच्छे येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमासाठी मा. रोहन बने सर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा हे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार आहेत.

कार्यक्रमात श्री विनोद देशपांडे (B.Sc, LLB, MBA) हे व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार असून त्यांनी व्यवस्थापन विषयाचे प्राध्यापक म्हणून सेवा बजावली आहे. तसेच ते Career Excel या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्थेचे संचालक आहेत. तरी गावातील सर्व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी 11 मे 2026 ते 16 मे 2026 या कालावधीत सायंकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मच्छे येथे आपली नावे नोंदवावीत. नाव नोंदणी करताना दहावीची गुणपत्रिका (मार्कशीट) सोबत आणणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *