Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

कोडचवाड ग्रामपंचायतीचे सदस्य राजूगौडा पाटील यांचा हिरेबागेवाडीजवळ अपघातात मृत्यू

  खानापूर : हिरेबागेवाडीजवळ राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका ग्रामपंचायत सदस्याचा जागीच मृत्यू झाला. खानापूर तालुक्यातील अवरोळी गावातील रहिवासी आणि कोडचवाड ग्रामपंचायतीचे चार वेळा सदस्य राहिलेले राजूगौडा पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला. ते भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. …

Read More »

इराण-इस्रायल युद्धात दोन भारतीय नागरिकांचा बळी, एक बेपत्ता; २८ जहाजांमध्ये ७७८ खलाशी अडकले, केंद्र सरकारची माहिती

  नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष बाराव्या दिवशी पोहोचला असून या तणावाचा परिणाम समुद्री वाहतुकीवरही दिसू लागला आहे. व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यात दोन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या …

Read More »

गॅस सिलिंडर पुरवठा मुद्द्यावर कर्नाटक विधानसभेत गोंधळ

  सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार वाद बंगळूर : स्वयंपाक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात झालेल्या व्यत्ययासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांचा आरोप आज विधानसभेत मोठ्या वादाला कारणीभूत ठरला. या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली आणि सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शून्यकालात काँग्रेसचे आमदार एच. डी. …

Read More »

हंदीगनूर महालक्ष्मी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळा उत्साहात

  बेळगाव : हंदीगनूर येथे श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळ्याचा कार्यक्रम मंगळवार (दि. १० मार्च) सकाळी उत्साहात पार पडला. जवळपास ५८ वर्षांनंतर हांदीगनूर तसेच परिसरातील म्हाळेनट्टी, बोडकेनहट्टी, होसोळी, कट्टनभावी, कुरिहाळ खुर्द आणि कुरिहाळ बुद्रुक या सहभागी गावांच्या संयुक्त विद्यमाने श्री महालक्ष्मी देवीची यात्रा येत्या १४ एप्रिल रोजी आयोजित …

Read More »

पुस्तकातील चुका सुधारा, शिक्षकांच्या बदल्या थांबवा : प्रसाद पाटील यांचे क्षेत्रशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

खानापूर : मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांच्या सर्वच पुस्तकात अनेक चुका असून त्या तात्काळ सुधाराव्यात तसेच तालुक्यातील शिक्षकांच्या तालुक्याबाहेरील बदल्या थांबवा, अशी मागणी गर्लगुंजी ग्रा. पं. माजी सदस्य प्रसाद पाटील व निट्टूर शाळा सुधारणा समिती अध्यक्ष नागराज देसाई यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी क्षेत्र शिक्षणाधिकारी पी. रामप्पा यांना निवेदन सादर केले …

Read More »

बोरगाव येथील अरण्यसिद्धेश्वर यात्रेनिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांची भेट

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरण्यसिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ झाला असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांनी मंदिरास भेट देऊन अरण्यसिद्धेश्वराचे दर्शन व आशीर्वाद घेतला. यावेळी यात्रा कमिटीतर्फे उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. उत्तम पाटील यांनी सत्कारबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन गावाची …

Read More »

आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

  महिलांसाठी मोफत सल्ला शिबिराची घोषणा! खानापूर : आंतरराष्ट्रीय महिला दिन खानापूर येथील आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उत्साहाने आणि कृतज्ञतेने साजरा करण्यात आला. आरोग्यसेवा क्षेत्रात तसेच समाजात महिलांचे अमूल्य योगदान ओळखण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हॉस्पिटलचे कर्मचारी, रुग्ण आणि डॉक्टर उपस्थित होते आणि त्यांनी महिलांच्या सामर्थ्याचा व आत्मविश्वासाचा …

Read More »

दिखाऊ साहित्य संमेलनांचा फुगा फुटणार कधी? सीमाभागातील मराठी पालकांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह

  बिदर (अविनाश देवकते) : सीमाभागातील मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतनासाठी नुकतेच भाल्की येथे तिसरे मराठी साहित्य संमेलन थाटामाटात पार पडले. व्यासपीठावरून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनेक ठराव मंजूर करण्यात आले आणि भाषणांचा पाऊसही पडला. मात्र, या संमेलनाच्या झगमगाटामागे एक कटू सत्य दडलेले आहे. केवळ वर्षातून एकदा असे कार्यक्रम घेऊन …

Read More »

रमजान पर्वाच्या अंतिम खंडास प्रारंभ; मुस्लिम बांधवांना रमजान ईदचे वेध

  निपाणीत खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी निपाणी (वार्ता) : रमजान ईदचे २० रोजे (उपवास) मंगळवार (ता.१०) रोजी पूर्ण झाले. त्यानिमित्ताने मगफिरत दुसऱ्या आशरा (खंड) ची सांगता झाली. बुधवार (ता.११) पासून तिसन्या आणि अंतिम खंडाची सुरवात झाली आहे. त्यानिमित्ताने उपवासाचे पदार्थ कपडे व इतर साहित्यांची खरेदीसाठी येथील बाजारपेठेत गर्दी होत आहे. रमजान …

Read More »

जांबोटीत सायकल स्पर्धेचा थरार, दत्तराज सडेकर याने मारली बाजी

  जांबोटी : जिंकण्यासाठीचा प्रचंड आत्मविश्वास त्यातून चाकाने घेतलेला भरधाव वेग, प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून पुढे जाण्याची धडपड, अन प्रेक्षकात होणारा जल्लोष असा सायकलिंग स्पर्धेचा थरार जांबोटी येथे अविस्मरणीय ठरला. गिअरहेड स्टुडिओज बेळगाव व विश्वभारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालय जांबोटी यांच्या संयुक्त विद्यमाने सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण …

Read More »