Monday , September 21 2026
Breaking News

संजीवनी फौंडेशनच्या काळजी केंद्रात जागतिक मातृदिन उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : संजीवनी फौंडेशनच्या काळजी केंद्रात जागतिक मातृदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात समूह नृत्य तसेच विविध मनोरंजक खेळ आयोजित करण्यात आल्याने वातावरण आनंदमय झाले. केंद्रातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाची रंगत वाढवली.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून जायंट्स सखीच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर उपस्थित होत्या. यावेळी त्यांचा चेअरमन मदन बामणे आणि संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. सविता देगीनाळ यांनी मातृदिनाचे महत्त्व सांगत मातृत्वाविषयी विचार व्यक्त केले. सुलक्षणा शिनोळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करून संजीवनी फौंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना शिरहट्टी यांनी केले तर राधिका कलादगी यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरिता सिद्दी, सावित्री माळी, सुनिल चन्नदासर, अक्षता अक्कोळे, कावेरी लमाणी आणि अंकिता राजोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *