Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

रोजच्या चुकीच्या लाइफस्टाईलमुळे वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका : डॉ. सविता कद्दु

  संजीवीनी फौंडेशन आयोजित व्याख्यान प्रसंगी केले महिलांना मार्गदर्शन हिंडलगा : सध्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढताना दिसून येतोय. याचे नक्की कारण काय हे शोधायचे झाले ते जगण्याची चुकीची पध्दत हेच मुख्य कारण असल्याचे मत प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. सविता कद्दु यांनी व्यक्त केले. महिला दिनानिमित्त संजीवींनी फौंडेशनच्या वतीने आठ मार्च …

Read More »

पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोन मुली जखमी

  खानापूर : तालुक्यातील बीडी गावात घरासमोर खेळत असलेल्या दोन मुलींवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. गावातील आराध्या काळे नावाच्या 10 वर्षीय मुलीवर प्रथम हल्ला केलेल्या कुत्र्याने तिला खाली पाडले आणि तिच्या कानाला चावा घेतला. त्यानंतर आणखी एक मुलगी निदा समशेर (10) हिच्यावरही हल्ला करून जखमी करून …

Read More »

भाजपचे 18 आमदार निलंबित..

    बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांनी विधानसभेतील भाजपच्या 18 आमदारांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. सभापतींच्या खंडपीठाचा अनादर केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या 18 आमदारांना तत्काळ 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांना तातडीने विधानसभा सोडण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या आहेत. लोकशाही व्यवस्थेत सभापतींच्या खंडपीठाचा आदर केला …

Read More »

कर्नाटक विधानसभेत मुस्लिम आरक्षण विधेयक मंजूर, मोठा गदारोळ, अध्यक्षांसमोर कागदपत्रे भिरकावली

  बेंगळुरू : कर्नाटक विधानसभेत हनी ट्रॅप प्रकरणावरून शुक्रवारी मोठा गदारोळ झाला. भाजपचे आमदार सभागृहाच्या वेलमध्ये शिरले आणि त्यांनी अध्यक्षांच्या खुर्चीसमोर कागदपत्रे फाडली आणि भिरकावली. या गोंधळामुळे कर्नाटक विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. दरम्यान, या गोंधळातच राज्य सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले. भाजपने हा …

Read More »

आनंदनगर दुसऱ्या क्रॉसमध्ये पाण्यासाठी महिलांची भटकंती..

  बेळगाव : आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव येथे ठराविक घरांना पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. इतरांच्या नळाला जसा पाणीपुरवठा सुरळीत होतो त्याचप्रमाणे आमच्या देखील नळाला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा अशा प्रकारची मागणी आनंदनगर भागातील महिला वर्गांनी केली आहे. आनंदनगर दुसरा क्रॉस येथील मोजक्या सात-आठ घरांच्या नळांना …

Read More »

ग्राहकाना वीज दरवाढीचा शॉक; प्रति युनिट ३६ पैसे दरवाढ

  पुढील दोन वर्षात अनुक्रमे ३५ व ३४ पैसे दरवाढीस मंजूरी बंगळूर : बस भाडे आणि मेट्रो भाडे यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्यानंतर कर्नाटक वीज आयोगाने (केईआरसी) ग्राहकांना विजेचा शॉक दिला आहे. वीजदरात प्रति युनिट ३६ पैसे वाढ करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. सुधारित दर एक एप्रिलपासून लागू …

Read More »

कर्नाटक बंद पुकारण्याची गरज नव्हती : डी. के. शिवकुमार

  बेंगळुरू : कर्नाटक राज्यातील विविध कन्नड संघटनांनी 22 मार्च रोजी कर्नाटक बंदची हाक देण्याची गरज नव्हती. त्यांच्या मागण्यांबाबत ते सरकारशी चर्चा करू शकले असते. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विधान परिषदेत सांगितले की, बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर काय पावले उचलली जातील याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाईल. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते …

Read More »

पत्नीच्या आत्महत्या प्रकरणात पतीला सशर्त जामीन

  बेळगाव : शारीरिक व मानसिक छळ करून पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवत अटक करण्यात आलेल्या पतीला बेळगाव पाचव्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव मारुती फकीरा जोगानी (रा. सांबरा) असे आहे. या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, मूळची राकसकोप …

Read More »

सुशिक्षितांच्या मनात आजही अस्पृश्यता ही एक शोकांतिकाच : विचारवंत संतोष यांची खंत

  बेळगाव : पूर्वी अस्पृश्यता आचरणात होती, आज अस्पृश्यता आचरणात नसली तरी ती सुशिक्षितांच्या मनात आहे, ही एक शोकांतिका आहे, असे विचारवंत भीमपुत्र संतोष यांनी म्हटले. बेळगावमधील डॉ. आंबेडकर उद्यान येथे कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद यांच्यावतीने शोषितांचा संघर्ष दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शोषितांच्या संघर्ष दिन कार्यक्रमात ते …

Read More »

विविध मागण्यांसाठी अंगणवाडी, आशा कार्यकर्त्यांचा मोर्चा

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सरदार हायस्कूल मैदानावरून सुरू झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित या …

Read More »