Sunday , July 26 2026
Breaking News

Belgaum Varta

जनगणतीसंदर्भात मराठा समाजातील नागरिकांनी कार्यतत्पर रहावे : मराठा समाजाचे संयोजक प्रकाश मरगाळे यांचे आवाहन

  बेळगाव : मराठा कुणबी समाजातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कर्नाटक सरकारने सुरू केलेल्या सामाजिक व शैक्षणिक जनगणतेसाठी (सर्वे) ज्या नागरिकांची जनगणती केली नाही, अशा नागरिकांनी आपले रेशन कार्ड व विद्युत मीटर क्रमांक तसेच आपल्या दरवाजावर लावलेला यूएचआयडी क्रमांक घेऊन आपण गणतीसाठी जे सरकारी अधिकारी येत आहेत त्यांच्याकडे याबाबत …

Read More »

श्री पंत महाराज पुण्यतिथी सोहळा 8 ऑक्टोबर पासून

  बेळगाव : कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या १२० व्या पुण्यतिथी सोहळ्याला बुधवार दिनांक ८ ऑक्टोबर पासून प्रारंभ होत आहे.या सोहळ्याची श्री दत्त संस्थान वतीने जय्यत तयारी सुरू आहे. सलग तीन दिवस चालणाऱ्या या पुण्यतिथी सोहळ्यामध्ये विविध कार्यक्रमांचे …

Read More »

चव्हाणवाड्यात खारीक, उदीचा प्रसाद

  निपाणी उरूस : फकिरांसह मानकऱ्यांकडून अर्पण गलेफ निपाणी (वार्ता) : निपाणी येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरुसाच्या तिसऱ्या दिवशी पहाटे दर्गाहचे संस्थापक संत बाबा महाराज चव्हाण यांच्या चव्हाण वारसातर्फे मानाचे निशाण व गलेफ संग्रामसिंह देसाई सरकार, रणजितसिंह देसाई सरकार, पृथ्वीराज चव्हाण, नवलिहाळकर सरकार, …

Read More »

संतांमुळेच मराठी भाषा समृद्ध : बजरंग धामणेकर

  बेळगाव : “मराठी भाषेला मोठी परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, हेमाद्री पंडित, चक्रधर स्वामी, सावता माळी, संत तुकाराम, समर्थ रामदास, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मोरोपंत, श्रीधर स्वामी यांच्यासारख्या अनेकांनी दिलेल्या योगदानामुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे” असे विचार बाल शिवाजी वाचनालयाचे संचालक बजरंग धामणेकर यांनी बोलताना व्यक्त केले. सार्वजनिक …

Read More »

व्यसन मोबाईलच्या जाळ्यात अडकलेल्या मराठा तरुणाईला बाहेर काढण्याची गरज : युवराज कदम

  बेळगाव : समाजातून स्पर्धात्मक परीक्षातून यश मिळून युपीएससी सारखे अधिकारी बनले पाहिजेत, मराठा समाजातील तरुणाई व्यसन आणि मोबाईलच्या जाळ्यात अडकलेली आहेत त्यांना परत मार्गावर आणण्याची गरज आहे. समाज म्हणून आपलं हे कर्तव्य आहे आणि आपण ते पार पाडले पाहिजे, असे मत काडा अध्यक्ष युवराज कदम यांनी व्यक्त केले. रविवारी …

Read More »

विभागीय फुटबॉल स्पर्धा : बेळगाव, चिकोडी, बागलकोट अंतिम फेरीत

  बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्रबोस लेले मैदानावर टिळकवाडी सार्वजनिक शिक्षण खात्याच्या विभागीय स्तरीय प्राथमिक मुला मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत उद्घाटनच्या दिवशी बेळगांव, चिकोडी, बागलकोट यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. सकाळी 10.00 वाजता स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी जुनेद पटेल, उद्योजक …

Read More »

नारी शक्ती ही देशाच्या आत्मा आहे : प. पू. प्राणलिंग स्वामीजी

  विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्ग निपाणी : श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ येथेविश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्ग शनिवारी सायंकाळी सुरू झाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प.पू. प्राणलिंग स्वामीजी तसेच मातृशक्तीच्या उपाध्यक्ष सुचिता ताई कुलकर्णी व दुर्गा वहिनीच्या प्रमुख श्वेता ताई हिरेमठ यांच्या हस्ते भारत …

Read More »

नंदगड येथील अंगणवाडी शिक्षिकेची आत्महत्या की हत्या?

खानापूर : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तिनेघाट-पालडा रस्ता क्रॉस जवळील पुलाखालील पाण्यात तरंगताना एका महिलेचा मृतदेह शनिवारी (रात्री) सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत महिलेची ओळख अश्विनी बाबुराव पाटील (वय ५०, रा. दुर्गानगर, नंदगड, ता. खानापूर) अशी पटली आहे. त्या अंगणवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी पाटील या …

Read More »

कर्नाटकमध्ये देशात सर्वाधिक वैद्यकीय जागा

  बंगळूर : चालू शैक्षणिक वर्षात, देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकमध्ये सर्वाधिक वैद्यकीय जागा मिळाल्या आहेत. यावर्षी राज्यात एमबीबीएस अभ्यासक्रमांसाठी १,२०० जागा वाढल्या आहेत. यामध्ये सरकारी आणि खासगी दोन्ही महाविद्यालयांचा समावेश आहे ज्यात एकूण १३,५९५ जागा आहेत, तर २०२४-२५ शैक्षणिक वर्षात १२,३९५ जागा मिळाल्या होत्या. या वर्षी, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने …

Read More »

जातीय जनगणनेसाठी वन, आरोग्य, शिक्षण विभागाचे कर्मचारी तैनात

  उपस्थित न राहिल्यास एफआयआर होणार दाखल बंगळूर : सामाजिक-शैक्षणिक सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या तयारीत असलेल्या राज्य सरकारने या सर्वेक्षणासाठी वन, आरोग्य आणि शिक्षण विभागातील कर्मचारी तैनात केले आहेत. मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (एचआरएमएस) पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या माहितीचा वापर करून सरकारने कार्यालयीन कर्मचाऱ्यांना स्वतंत्र संदेश आणि ईमेल …

Read More »