Monday , September 21 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये मराठी भाषा दिन साजरा

Spread the love

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे शाळेतील शिक्षक प्रसाद सावंत यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांच्या संगीत मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ‘उषःकाल होता होता’ हे गाणे सादर केले. मराठी विभागातर्फे ‘शब्दोद्यान’ या हस्तलिखिताचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेची सद्य परिस्थिती याबद्दल‌ आपल्या मनोगतात प्रसाद सावंत यांनी व्यक्त केले. शाळेतील मराठी विषय शिक्षक बी.एम्. पाटील, माया पाटील, दीप्ती कुलकर्णी, जयश्री पाटील, कमल हलगेकर, शामला चलवेटकर, नम्रता पाटील, शैला पाटील, मुक्ता आलगोंडी, स्नेहल पोटे, शाहीन शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.
इयत्ता पाचवी ‘ब’ च्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका मंजुषा पाटील यांच्या मार्गदर्शनाने भित्तीपत्रके बनविली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, शिक्षण समन्वयक सविता पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका दीप्ती कुलकर्णी यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *