Thursday , June 4 2026
Breaking News

दीड वर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला; महिलेला नागरिकांचा चोप

Spread the love

 

बेळगाव : दीड वर्षीय लहान मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न स्थानिक नागरिकांनी हाणून पाडल्याची घटना बेळगाव शहरातील न्यू गांधीनगर परिसरात घडली. संशयित महिलेला रंगेहात पकडून नागरिकांनी मारहाण केल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव शहरातील न्यू गांधीनगर येथे घराजवळ खेळत असलेल्या दीड वर्षीय मुलाला एका महिलेने पिशवीत घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
सदर प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ महिलेला पकडले.
घटनेची माहिती माळमारुती पोलीस स्थानकाला दिली असता पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी घटनास्थळी धाव घेत लहान मुलाचे अपहरण करणाऱ्या त्या महिलेला ताब्यात घेतले.
शहर परिसरातही अशाच प्रकारच्या घटना घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेचा कसून तपास पोलीस करत असून सुट्टीच्या काळात घराजवळ खेळणाऱ्या लहान मुलांवर पालकांनी लक्ष ठेवण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे. तसेच पोलिस प्रशासनानेही या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

वैश्यवाणी समाजातर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक साहित्य वाटप

Spread the love  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *