Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

सावकारी धंद्याचे उच्चाटन करण्याच्या हेतूने सहकारी सोसायट्यांचा जन्म : डॉ. सुनील नागावकर

  धनश्री सोसायटीच्या प्रधान कार्यालयाचा शुभारंभ थाटात बेळगाव : धनश्री पतसंस्थेने स्वतःची प्रगती साधत समाजातील लोकांचा विश्वास संपादन करून, लोकांची सेवा करणारी एक उत्तम सहकारी संस्था म्हणून नाव कमावले आहे. त्याचबरोबर पतसंस्थांनी व्यावसायिक व्यवस्थापन करणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. जोखीम कमी करून व्यावसायिक व्यवस्थापन केल्यास संस्थेची प्रगती होते, पतसंस्था टिकल्या …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना स्वामीजींचा पाठिंबा

  बंगळुरू : मागासवर्गीय आणि दलित आणि शोषित समुदायांच्या स्वामीजींच्या संघाने आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची कावेरी निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना बिनशर्त नैतिक पाठिंबा जाहीर केला. केंद्र सरकार आणि राजभवनातून सरकार अस्थिर करण्याच्या कारस्थानाचा स्वामीजींनी तीव्र शब्दात निषेध केला आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या वतीने या षडयंत्राविरुद्ध लढा देण्याची घोषणा केली. …

Read More »

इस्कॉन मंदिरातील सोमवार व मंगळवारचे कार्यक्रम

  बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनांमृत संघ (इस्कॉन) च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त सोमवार व मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 26ऑगस्ट रोजी जन्माष्टमी सोमवार दि. 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमीनिमित्त पहाटे 4.30 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत भजन, कीर्तन, प्रवचन, अभिषेक, नाट्यलीला आदी कार्यक्रम होणार आहेत. पपू भक्तीरसामृत स्वामी …

Read More »

आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र कार्यशाळेत निपाणीतील दोन शिक्षकांचा सहभाग

  निपाणी (वार्ता) : बंगळूर येथील ‘हॉल ऑफ सायन्स’ रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री येथे आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र कार्यशाळा पार पडली. त्यामध्ये निपाणी येथील संभाजीनगर शाळेचे शिक्षक सलीम नदाफ आणि भोज येथील न्यू सेकंडरी स्कूलचे शिक्षक दिलीप शेवाळे यांनी सहभाग घेतला. दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत देश विदेशातील माध्यमिक शिक्षक सहभागी झाले …

Read More »

इस्कॉन आयोजित श्रीकृष्ण कथा महोत्सवाचा समारोप

  बेळगाव : श्रीकृष्ण कथा महोत्सवातील पाचव्या दिवशी म्हणजे शनिवारी सायंकाळी इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी भगवंतांच्या तीन विवाहांची माहिती दिली. कौशल देशाचा राजा नग्नजीत यांची कन्या सत्या जिला नग्नाजीती असेही म्हटले जायचे तिच्याबरोबर विवाह केला. ज्यावेळीला भगवान श्रीकृष्ण कौशल राज्यात गेले त्यावेळेला त्यावेळी नग्नजीत महाराज सत्या देवीचा …

Read More »

निपाणीत ३० रोजी दहीहंडीचा थरार; गोविंदा पथकाला दीड लाखाचे बक्षीस

  दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन व पैलवान अजित नाईक युवा शक्तीतर्फे आयोजन निपाणी (वार्ता) : येथील दिवंगत दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशन, हेल्थ क्लब व पैलवान अजित नाईक युवाशक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता.३०) दुपारी ४ वाजता म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर दीड लाख रुपयांच्या दहीहंडीचा थरार आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती …

Read More »

राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे वधू -वर मेळावा संपन्न

  बेळगाव : सुप्रसिद्ध डॉक्टर व भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित वधू -वर मेळावा आज रविवारी सकाळी रामनाथ मंगल कार्यालय येथे यशस्वीरित्या पार पडला. सदर वधू -वर मेळाव्याप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी गोसाई मठ गावीपूर बंगलोर येथील मराठा समाजाचे स्वामीजी श्री जगतगुरु वेदांताचार्य मंजुनाथ स्वामीजी …

Read More »

पुढील दोन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता

  बंगळुरू : किनारपट्टीवरील उत्तर कन्नड, उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांमध्ये दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 ऑगस्टपर्यंत कर्नाटक किनारपट्टीवर ताशी 35 ते 45 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील 48 तासांत बंगळुरूमध्ये ढगाळ हवामान राहील. ढगांच्या गडगडाटासह …

Read More »

बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न : नागरिकांनी दिला नराधमाला चोप

बेळगाव : घरी सोडण्याच्या बहाण्याने मुलीला निर्जनस्थळी नेऊन अल्पवयीन बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग येथे घडली. बालिकेने आरडाओरडा करताच नागरिकांनी धाव घेत नराधमास पकडून नागरिकांनी बेदम मारहाण केली. सुनील दीपाले याने 12 वर्षीय बालिकेला घरी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून निर्जनस्थळी नेले. बालिकेची आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत …

Read More »

कोनवाळ गल्ली गणेशोत्सव मंडळाची कार्यकारिणी जाहीर

  बेळगाव : कोनवाळ गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची २०२४-२५ ची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. अध्यक्षपदी बळवंत रामा शिंदोळकर, उपाध्यक्षपदी केतन मिलिंद देसूरकर, गुरुराज चांदेकर, सचिवपदी गुरुनाथ होसूरकर यांची निवड केली आहे. तसेच सहसचिवपदी उमेश लोहार, अनिकेत शिंदे, अभिषेक भागानगरे, पांडुरंग गवळी यांची, खजिनदारपदी निखिल देसूरकर, उपखजिनदारपदी युवराज …

Read More »