Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

शट्टिहळ्ळी – मरणहोळ पूल पाण्याखाली

  दड्डी : शट्टिहळ्ळी ता. हुक्केरी येथील घटप्रभा नदीला पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तालुक्यातील पावसाची संततधार वाढली असून शट्टिहळ्ळी -मरणहोळ पूल दिवसभराच्या पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. आज दिवसभर जोरात पडत आसलेल्या या पावसामुळे बंधाऱ्यावर पाणी आले असून बंधारा पाण्याखाली गेला आहे. गेल्या 15 दिवसापासुन मोदगा बंधारा पाण्याखाली गेला आहे. …

Read More »

कौलापूरवाडा येथील पोल्ट्री फार्म त्वरित हटवा; खानापूर ब्लॉक काँग्रेस व ग्रामस्थांची मागणी

  खानापूर : माणसे मेली तरी चालतील पण कोंबड्या जगल्या पाहिजेत अशी काहीशी भूमिका खानापूर तालुक्यातील अधिकारी वर्ग कौलापूरवाडा पोल्ट्री फार्म प्रकरणी वागत असल्याचे दिसून येत आहे. खानापूर तालुक्यातील कौलापूरवाडा येथे क्वालिटी कंपनीचे पोल्ट्री फार्म आहे. नियमाप्रमाणे कोणतेही पोल्ट्री फार्म गाव वस्तीपासून 200 मीटर दूर अंतरावर असणे बंधनकारक आहे. परंतु …

Read More »

समादेवी मंदिराबाबत अधिसूचना काढणे चुकीचे

  बेळगाव : धर्मादाय खात्याने चुकीच्या माहितीच्या आधारे समादेवी मंदिरावर सरकारी समिती स्थापन करण्याबाबत अधिसूचना काढली आहे, असा दावा करत समादेवी मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवार दि. १८ धर्मादाय खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर निर्णय घेऊ नये, अशी विनंती केली. त्यामुळे सरकारी समितीच्या यादीतून समादेवी मंदिराचे नाव वगळण्यात येईल, …

Read More »

बेळगाव हेस्कॉम ग्राहकांची तक्रार निवारणासंदर्भात उद्या बैठक

  बेळगाव : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाची मासिक बैठक शनिवारी 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता हेस्कॉम सहाय्यक कार्यकारी अभियंता उपविभाग 1, बेळगाव यांच्या कार्यालयात होणार आहे. वीज पुरवठा, बिलिंग व वीज विभागाच्या इतर समस्यांबाबत ग्राहकांना त्यांचे नाव, आरआर क्रमांक, पत्ता व मोबाईल क्रमांकासह लिखित सूचना या बैठकीत देता …

Read More »

कन्नडिगांना नोकरीत आरक्षण मिळावे; करवे प्रवीण शेट्टी गटाची बेळगावात निदर्शने

  बेळगाव : कन्नडिगांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज करवे प्रवीण शेट्टी ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी “कन्नडीगांचा स्वाभिमान दुखावणाऱ्या उद्योगपतींचा धिक्कार असो ” कन्नडिगांना आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या प्रवीण शेट्टी गटाच्या एका नेत्याने सांगितले की , …

Read More »

पंचगंगा नदी इशारा पातळीच्या दिशेने; ७२ बंधारे पाण्याखाली

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पाऊस पडला. पंचगंगा नदी इशारा पातळीच्या दिशेने वाहत आहे. गेल्या २४ तासात पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांच्या संख्येत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. सायंकाळी चार वाजता ७२ बंधारे पाण्याखाली गेले होते. जिल्ह्यात आज सर्वच भागात जोरदार पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रात संततधार कायम आहे. शहरातही पावसाने …

Read More »

सुट्टीवर घरी आलेल्या जवानाचे हात-पाय आणि डोळे बांधून विष पाजले!

  गडहिंग्लज : सुट्टीवर घरी आलेल्या जवानाचे हात-पाय आणि डोळे बांधून विष पाजवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्या जवानाच्या पत्नीसह अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सदर घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात घडली असून अमर भिमगोंडा देसाई, असे या ३९ वर्षीय जवानाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात दाखल करण्यात आले …

Read More »

मतिमंद मुलीवर अतिप्रसंग केलेल्या “त्या” नराधमाला फाशी द्या : कडोली येथील मुस्लिम समाजाची मागणी

  बेळगाव : कडोली येथील मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुस्लीम समाजातील तरुणाला फाशी द्यावी, अशी मागणी कडोलीच्या समस्त मुस्लिम समाजाने केली आहे. मतिमंद तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कडोली येथील मुस्लीम बांधवांनी निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. कडोली गावातील …

Read More »

नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी यासाठी आम. विठ्ठल हलगेकर यांनी घेतली महसूल अधिकाऱ्यांची भेट

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबियांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यासाठी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी महसूल अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. मुसळधार पावसामुळे खानापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पावसाचा तडाखा बसला असून येथील नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी …

Read More »

खानापूरात मुसळधार पाऊस; हेम्मडगा रस्ता बंद

  खानापूर : खानापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे खानापूरहून हेम्मडगाकडे जाण्याऱ्या हालत्री नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले असून या पुलावरील वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. खानापूरमध्ये 41 मिमी, नागरगाळी 64.4 मिमी, बिडी 45.4 मिमी, कक्केरी 40.2 मिमी, असोगा 50.8 मिमी, गुंजी 76.2 मिमी पाऊस, लोंढा रेल्वे स्थानक 101 मिमी, लोंढा पीडब्ल्यूडी …

Read More »