Monday , March 24 2025
Breaking News

जगप्रसिद्ध म्हैसूर दसऱ्याचा भव्य शुभारंभ!

Spread the love

 

बेंगळुरू : जगप्रसिद्ध म्हैसूर दरशोत्सवाचा शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक नाडोज हंप यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. चामुंडी मातेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यंदाही परंपरेनुसार दसरा मोठ्या थाटात साजरा केला जात आहे. चामुंडी टेकडीवर बांधलेल्या पारंपरिक मंडपात चामुंडी मातेच्या मूर्तीची विशेष पूजा पार पडली. उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, ज्येष्ठ साहित्यिक नाडोज हंप, नागराजय्या, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि इतर मंत्री सहभागी झाले होते.

कार्यक्रमात बोलताना सीएम सिद्धरामय्या म्हणाले, आपण चूक केली असती तर इतके दिवस राजकारण करता आले नसते. अखेर सत्याचाच विजय होतो. जनतेचा आशीर्वाद असेपर्यंत मला कोणीही काही करू शकत नाही, अशी गर्जना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. देवेगौडा यांनीच मला या मतदारसंघात पराभूत केले. मी नऊ वेळा निवडणूक जिंकली आहे. चामुंडेश्वरीचे उपकार मी आत्तापर्यंत विसरलेले नाहीत. मी काही चुकीचे केले नाही असे सांगून मुख्यमंत्र्यांनी चूक केली असती तर त्यांना इतके दिवस राजकारण करता आले नसते, असे ते म्हणाले.

चामुंडी देवीने दिलेल्या शक्तीने आम्ही पाच हमी योजना अंमलात आणल्या आहेत. सत्त्वेर आलेल्या सरकारने वाम मार्गाने मिळविलेल्या गोष्टी कधीही चुकीचाच असतात हे हंपणा यांचे विधान सध्याच्या परिस्थितीला लागू होते असे ते म्हणाले.
यावेळी हंपणा दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. कन्नड सारस्वत जगतात हंपना यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी दुर्मिळ साहित्य निर्माण केले अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

About Belgaum Varta

Check Also

भाजपचे 18 आमदार निलंबित..

Spread the love    बेंगळुरू : कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांनी विधानसभेतील भाजपच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *