Sunday , September 20 2026
Breaking News

साठे प्रबोधिनीतर्फे मराठी लेखन, वाचन व अभिनय कौशल्य कार्यशाळा

Spread the love

 

बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्यातर्फे मुलांना लेखन व वाचनाची आवड निर्माण व्हावी, मुलांनी अभ्यासाबरोबर वेगवेगळे छंद जोपासावेत. त्यांचे लेखन व वाचन कौशल्य विकसित व्हावे, मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी लेखन, वाचन व अभिनय कौशल्य कार्यशाळा मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर २०२४ ते मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आयोजित केली आहे. या कार्यशाळेत प्राथमिक व माध्यमिक शाळेतील 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. या कार्यशाळेत लघु चित्रपट निर्माते, नाट्य दिग्दर्शक श्री. शिवराज चव्हाण व प्रसिद्ध नवोदित कवयित्री हर्षदा सुंठणकर मार्गदर्शन करीत आहेत. या कार्यशाळेच्या निमित्ताने बेळगाव परिसरातील मराठी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांची मराठी भाषा, शिक्षण अर्थपूर्ण व आनंददायी व्हावे, त्यांचे लेखन-वाचन कौशल्य विकसित व्हावे, विचार अभिव्यक्तीला वाव मिळावा हा उद्देश आहे. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री जयंत नार्वेकर, सचिव श्री. सुभाष ओऊळकर यांचे सहकार्य लाभले आहे तर प्रबोधिनीचे सदस्य मालोजी अष्टेकर, विजय बोंगाळे, नीला आपटे, गौरी चौगुले, इंद्रजीत मोरे, धीरजसिंह राजपूत, बी. बी. शिंदे, प्रसाद सावंत, गजानन सावंत हे परिश्रम घेत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *