नागरिकांचे निवेदन; पालकमंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : जत्राटवेस लखनापूर केसरकर मळा मार्गावरील ओढ्याचा पुल, रस्त्यासह मार्गी लावा, यासह शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा. यासाठी पर्यायी तलाव निर्मिती व शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहरलाल तलावातील गाळ उपसा करावे. गाळ काढताना संरक्षण भिंतीला तडा जाऊ नये. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पालकमंत्री सतीश …
Read More »वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी राज्यस्तरावर प्रवेश परीक्षा घ्यावी : प्रा. राजन चिकोडे यांची मागणी
निपाणी (वार्ता) : नीट परीक्षेच्या नावाखाली खाजगी क्लासेसनी बाजार मांडला आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. प्रत्येक राज्य आपल्या राज्यातीलच विद्यार्थी अधिक प्रमाणात वैद्यकीय शिक्षण घ्यावेत, यासाठी दक्ष आहेत. त्यामुळे ‘वन नेशन, वन एक्झाम’ ऐवजी प्रत्येक राज्याला वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी केंद्र सरकारने निवड चाचणी परीक्षा घेणेची परवानगी द्यावी, …
Read More »पोक्सो प्रकरण: येडियुरप्पा झाले सीआयडीसमोर सुनावणीला हजर
बंगळूर : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा पोक्सो प्रकरणी चौकशीसाठी आज सीआयडी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. या प्रकरणी येडियुरप्पा यांना अटक न करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अटकेची भीती न बाळगता सीआयडी अधिकाऱ्यांसमोर हजर राहून या प्रकरणाबाबत आपले म्हणणे नोंदवले. बंगळुरमधील पॅलेस रोड येथील सीआयडी मुख्यालयात …
Read More »भाजपकडे आंदोलन करण्याची नैतिकता नाही
मुख्यमंत्र्यांचा भाजपवर घणाघात; मोदींच्या काळात इंधन दरात मोठी वाढ बंगळूर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन करण्याची भाजपकडे नैतिकता नसल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी केंद्रात पंतप्रधान झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाल्याचा पलटवार त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या गृह कार्यालय कृष्णा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पेट्रोल …
Read More »राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाचे काम पूर्ण करा; शहरवासीयातर्फे निवेदन
निपाणी (वार्ता) : राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाचे काम बऱ्याच वर्षापासून रखडले आहे. तात्काळ निधी मंजूर करून त्याचे काम पूर्ण करावे, यासह विविध समस्या सोडवण्याबाबतचे निवेदन माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले यांच्या नेतृत्वाखालील माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी सभापती, नगरसेवकांनी पालकमंत्र्यांना दिले. माहिती अशी, उद्यानाचे सुशोभीकरण, विकासकामे, जनरेटर व पूलिंग यांसारख्या …
Read More »मतदार संघात समस्या शिल्लक राहणार नाहीत
पालकमंत्री सतीश जारकीहोळी; पालकमंत्र्यांचा निपाणी दौरा निपाणी (वार्ता) : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतिश जारकीहोळी यांनी सोमवारी (ता.१७) निपाणी दौरा केला. येथील शासकीय विश्राम धामावर त्यांनी निपाणी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. शिवाय अनेकांनी विविध समस्याबाबत निवेदने दिली. लवकरच समस्यामुक्त निपाणी मतदारसंघ करण्याचे आश्वासन दिले. …
Read More »राहुल गांधी वायनाडची जागा सोडणार, प्रियांका गांधी लढवणार खासदारकीची निवडणूक
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अखेर केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडला. राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा देणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबत घोषणा केली आहे. प्रियांका गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवणार आहेत. तर राहुल गांधी रायबरेलीची खासदारकी कायम ठेवणार आहेत. काँग्रेस नेते …
Read More »भाजपच्यावतीने पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात निदर्शने
बेळगाव : राज्य सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा निषेध करत बेळगावात भाजप कार्यकर्त्यांनी चक्क दुचाकीच्या दावणीला बैल बांधून निषेध नोंदविला. राणी कित्तूर चन्नम्मा येथे भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपचे आमदार अभय पाटील व माजी आमदार महादेवप्पा यादवाड, अनिल बेनके, महांतेश दोड्डगौडर, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी आदी नेत्यांनी दुचाकीला बैलाची जोड देत …
Read More »गोवावेस येथील मनपाच्या महसूल विभागात चोरी
बेळगाव : गोवावेस येथील मनपा इमारतीत असलेल्या महानगर निगम बेळगाव महसूल विभागामध्ये चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गोवावेस तेथील महानगरपालिकेच्या इमारतीत वार्ड क्र १ ते २६ दक्षिण विभागाचा कारभार चालतो. सकाळी १०-३० वाजता. ऑफिस कर्मचाऱ्यारी प्रवेश केल्यानंतर महत्वाची कागदपत्रे विस्कटल्याचे आढळून आले. तसेच एक लॅपटॉप देखील चोरीस गेल्याचे …
Read More »बेळगावात बकरी ईद सण उत्साहात; ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा
बेळगाव : बलिदानाचे प्रतीक असलेला मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-अधा किंवा बकरी ईद मोठ्या धार्मिकतेने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. बकरी ईदच्या निमित्ताने सामूहिक नमाज अदा ‘ईद-उल-अधा ‘ हा सण इस्लामिक कॅलेंडरच्या 12व्या महिन्यात म्हणजेच ए-जिल्हिज्जा महिन्यात साजरा केला जातो. मुस्लिम समाजातील लोकांसाठी हा सण खूप खास आहे. बलिदानाचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta