Monday , September 21 2026
Breaking News

नौदलाची गुप्त माहिती फोडणाऱ्या तिघांना एनआयएकडून अटक

Spread the love

 

बंगळुरू : एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आज उत्तर कन्नड जिल्ह्यात छापे टाकले. कारवार तालुक्यातील मुदगा, तोडुरू, कुमठा हनेहळ्ळी या गावांमध्ये एनआयएने छापा टाकला.

नौदल तळाचा फोटो असल्याची गुप्त माहिती समोर आल्यानंतर एनआयए अधिकाऱ्यांनी नौदल तळावरील तिघांची चौकशी केली. २०२३ मध्ये दीपकला एनआयएने हैदराबादमधून अटक केली होती. दीपकच्या चौकशीत स्फोटक माहिती समोर आली आणि त्याचाच पाठपुरावा म्हणून हा छापा घालण्यात आला.

दीपकच्या चौकशीत तिघांची नावे समोर आली. दीपक यांनी सुनील नायक, अक्षय नायक, ईवप तांडेल यांची माहिती दिली होती. ते सर्वजण कारवार ग्रामीण भागातील असून कंत्राटी पद्धतीने काम करत होते. गुप्त माहिती लीक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून एनआयए अधिकाऱ्यांनी तिघांचे मोबाईल जप्त केले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *