Saturday , November 7 2026
Breaking News

Belgaum Varta

डॅडी अखेर तुरुंगाबाहेर! नगरसेवक हत्या प्रकरणी अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

  मुंबई : कुख्यात डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर गवळीला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर अपील अद्याप प्रलंबित आहे. वय आणि अपीलवरील प्रलंबित सुनावणीचा विचार करून गवळीला न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती …

Read More »

दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप!

  बेळगाव : “गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्यावर्षी लवकर या” अशा जयघोषात, बेळगाव शहर आणि तालुक्यातील गणेशभक्तांनी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. गुरुवारी दीड दिवसांच्या बाप्पांचे वाजत-गाजत उत्साहात, भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यास दुपारनंतर प्रारंभ झाला. बुधवारी जल्लोषात आगमन झालेल्या बाप्पांचे विधिवत पूजन आणि नैवेद्य आदी कार्यक्रम घरोघरी पार पडले. …

Read More »

पोलीस महासंचालक संदीप पाटील यांचे जागतिक ट्रायथलाॅन स्पर्धेत सुयश

  बेंगळूर : कर्नाटकचे पोलीस महासंचालक (आयजीपी) आणि बेळगावचे माजी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी कोपनहेगन येथे आयोजित जागतिक ट्रायथलाॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून आपल्या देशासह राज्याचा नावलौकिक वाढवला आहे. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे नुकतीच जागतिक ट्रायथलॉन स्पर्धा पार पडली. जगातील सर्वात खडतर स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेमध्ये विविध …

Read More »

आमदार विठ्ठल हलगेकर डीसीसी बँक निवडणुकीच्या रिंगणात; निवड समितीची घोषणा

  खानापूर : खानापूर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर हे बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या निवडणुकीच्या शर्यतीत उतरले आहेत. खानापूर येथील शांतिनिकेतन शाळेत गुरुवारी (२८ ऑगस्ट) आयोजित पत्रकार परिषदेत सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी स्थापन केलेल्या निवड समितीचे अध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी ही माहिती दिली. आमदार विठ्ठल हलगेकर, गर्लगुंजी पीकेपीएसचे …

Read More »

हॉकी बेळगाव व शासनातर्फे 29 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन

  बेळगाव : हॉकी बेळगाव, जिल्हा युवजन क्रीडा खाते व गट शिक्षण खात्यातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदान येथे शुक्रवार दि. 29 ऑगस्ट रोजी 10 वाजता साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अभिनव जैन, जिल्हा युवजन क्रीडा अधिकारी बी श्रीनिवास, गट शिक्षण खात्याच्या …

Read More »

बेळगावात सकल मराठा – मराठी क्रांती (मूक) मोर्चातर्फे उद्या बैठक

  बेळगाव : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदान मुंबई येथील आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासह पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी ५.०० वाजता जत्ती मठ देवस्थान बेळगांव येथे सकल मराठा व मराठी क्रांती (मूक) मोर्चातर्फे बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीस सर्व मराठा समाजातील बांधवांनी …

Read More »

आदर्श सोसायटीला 1 कोटी 53 लाखाचा निव्वळ नफा

  बेळगाव : “32 व्या वर्षाची यशस्वी वाटचाल करीत असलेल्या आदर्श सहकारी सोसायटीने सामाजिक जबाबदारी सांभाळत असतानाच सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेत 1 कोटी 53 लाख 70 हजार रुपयाचा निव्वळ नफा मिळवला आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो. यामागे संचालकांची एकजूट, कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता आणि सभासदांनी केलेले सहकार्य कारणीभूत आहे.” असे …

Read More »

मनोज जरांगेंच्या मोर्चाचा दुसरा दिवस, मराठा मोर्चा आज मुंबईत धडकणार!

  जुन्नर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मोर्चा घेऊन मुंबईला निघाले आहेत. ते मुंबईतीली आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मनोज जरांगेंचा मोर्चा आता जुन्नरमध्ये दाखल झाला आहे. किल्ले शिवनेरीच्या …

Read More »

बडेकोळमठजवळ बस उलटली; दोघांचा मृत्यू

  बेळगाव : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री बडेकोळमठ घाटजवळ गोगटे कंपनीची बस उलटून दोन जणांचा मृत्यू झाला. हुबळीहून पुण्याला जाणारी गोगटे कंपनीची खासगी बस उलटली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला. बसमधून एकूण १२ जण प्रवास करत होते. यामध्ये एका महिला आणि एका पुरूषाचा मृत्यू झाला. हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आणि …

Read More »

एकात्मतेचा संदेश देत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना!

  बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि एकतेचा संदेश दिला. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यावर्षीही त्यांच्या घरी गणेश मूर्तीची स्थापना केली. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगावच्या चन्नम्मा सर्कलमधील गणेश मंदिरात विशेष पूजा केली. बुधवारी, संपूर्ण शहरात भाविक गणेशाची स्थापना करण्यात व्यस्त होते. जिल्हाधिकारी त्यांच्या कुटुंबासह …

Read More »