Friday , November 6 2026
Breaking News

बडेकोळमठजवळ बस उलटली; दोघांचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री बडेकोळमठ घाटजवळ गोगटे कंपनीची बस उलटून दोन जणांचा मृत्यू झाला.

हुबळीहून पुण्याला जाणारी गोगटे कंपनीची खासगी बस उलटली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला. बसमधून एकूण १२ जण प्रवास करत होते. यामध्ये एका महिला आणि एका पुरूषाचा मृत्यू झाला.

हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आणि स्थानिकांनी बसमधून नऊ जणांना बाहेर काढले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यात आले आणि त्यांना बेळगावच्या बिम्स रुग्णालयात हलवण्यात आले.

ही घटना हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *