Friday , November 6 2026
Breaking News

एकात्मतेचा संदेश देत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना!

Spread the love

 

बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि एकतेचा संदेश दिला. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यावर्षीही त्यांच्या घरी गणेश मूर्तीची स्थापना केली. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगावच्या चन्नम्मा सर्कलमधील गणेश मंदिरात विशेष पूजा केली.
बुधवारी, संपूर्ण शहरात भाविक गणेशाची स्थापना करण्यात व्यस्त होते. जिल्हाधिकारी त्यांच्या कुटुंबासह चन्नम्मा सर्कलमधील गणेश मंदिरात विशेष प्रार्थना केली आणि पारंपारिकपणे पर्यावरणपूरक गणपतीची प्रतिष्ठापना केली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत त्यांचे कुटुंब, अतिरिक्त उपायुक्त आणि उपायुक्त कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *