Monday , September 21 2026
Breaking News

दीड दिवसाच्या गणपती बाप्पाला निरोप!

Spread the love

 

बेळगाव : “गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्यावर्षी लवकर या” अशा जयघोषात, बेळगाव शहर आणि तालुक्यातील गणेशभक्तांनी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. गुरुवारी दीड दिवसांच्या बाप्पांचे वाजत-गाजत उत्साहात, भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यास दुपारनंतर प्रारंभ झाला.

बुधवारी जल्लोषात आगमन झालेल्या बाप्पांचे विधिवत पूजन आणि नैवेद्य आदी कार्यक्रम घरोघरी पार पडले. या कार्यक्रमानंतर लाडक्या बाप्पांना निरोप देण्याचा सोहळा देखील उत्साहाने पार पडला. मनामध्ये हुरहूर असूनही गणपती बाप्पांच्या विधिवत पूजनासाठी तसेच दीड दिवसांच्या विसर्जनासाठी भक्तांनी सार्वजनिक तलावांच्या ठिकाणी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *