Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

पाण्याच्या टाकीत पडून अडीच वर्षाच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू

  बेळगाव : खेळता खेळता अनावधानाने घरासमोरच्या पाण्याच्या टाकीत पडून अडीच वर्षाच्या बालिकेचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. साईशा संदीप बडवाण्णाचे (रा. कंग्राळ गल्ली) असे मृत बालिकेचे नाव आहे. रविवारी सायंकाळी कंग्राळ गल्ली येथे ही घटना उघडकीस आली. पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, रविवारी नळाला पाणी आले होते. त्यामुळे पाणी …

Read More »

कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्यांदा आयपीएल विजेता

  कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल २०२४ चा चॅम्पियन संघ ठरला आहे. सनरायझर्स हैदराबादचा ८ विकेट्सने पराभव करत मोठा विजय नोंदवला. हैदराबादने केकेआरला विजयासाठी अवघ्या ११४ धावांचे सोपे आव्हान दिले होते. कोलकाता संघाने अवघ्या षटकांत हे आव्हान सहज गाठले. व्यंकटेश अय्यर आणि रहमानउल्ला गुरबाजच्या ९१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर झटपट धावा केल्या. …

Read More »

दिल्‍लीत बेबी केअर सेंटरला भीषण आग; ६ नवजात बालकांचा होरपळून मृत्‍यू

  नवी दिल्‍ली : पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथे (शनिवार) रात्री बेबी केअर सेंटरला लागलेल्या भीषण आगीत 6 मुलांचा होरपळून मृत्यू झाला. रात्री उशिरा 12 मुलांची सुटका करण्यात आली, त्यापैकी 6 मुलांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयात सध्या 6 मुले दाखल आहेत, एका मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दिल्ली अग्निशमन …

Read More »

राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये ‘अग्नितांडव’; 30 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांमध्ये 12 लहान मुले

  राजकोट : शनिवारी (25 मे 2024) टीआरपी गेम झोनमध्ये भीषण आग लागली. या आगीत 30 लोकांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. राजकोटमधील गेम झोन हे गर्दीचं ठिकाण असल्यानं आग लागली …

Read More »

स्वतःची अधुरी प्रेमकहाणी सांगत मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडून तरुणांना आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन

  कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं. सिद्धरामय्या म्हणाले, “मी महाविद्यालयात शिकत होतो तेव्हा माझं एका मुलीवर प्रेम होतं. मी मोठ्या हिंमतीने त्या मुलीसमोर माझ्या प्रेमाची कबुली दिली आणि तिला लग्नासाठी विचारलं. मात्र आमची जात वेगवेगळी असल्यामुळे ते नातं पुढे जाऊ शकलं नाही.” कर्नाटकचे …

Read More »

राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये भीषण आग; दहा जणांचा मृत्यू

  राजकोट : गुजरातच्या राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये तब्बल १० लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितलं. ”आगीमागचं नेमकं कारण काय, याचा तपास सुरु असून शहरातील सगळे गेमिंग झोन बंद करण्याचे आदेश दिले आहेत” अशी माहिती पोलिस आयुक्तांनी …

Read More »

उडपीत दोन गटात धुमश्चक्री: कारने तरुणाला चिरडले

  उडपी : कर्नाटकच्या उडपी भागातील कुंजीबेट्टू परिसरात कापू भागातील तरुणांच्या दोन टोळक्यांमधील वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. उडपी-मणिपाल राष्ट्रीय महामार्गावरील या घटनेचा व्हिडीओ एका इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने शूट केला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. तसेच, गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या तलवारी, …

Read More »

गुगल मॅप्सच्या भरवशावर फिरायला निघाले, पण थेट कालव्यात जाऊन पडले

  केरळमध्ये सध्या जोरदार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या असून यात ११ जणांचा बळी गेला आहे. अशातच केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दक्षिण केरळ जिल्ह्यातील कुरुप्पनताराहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणारी एक कार खोल कालव्यात कोसळली आहे. या कारमधून …

Read More »

महावीर गोशाळेला चारा वाटप : फेसबुक फ्रेंड सर्कलचे कार्य

  बेळगाव : फेसबुक फ्रेंड सर्कलतर्फे बेळगाव येथील महावीर गोशाळेत गायींना चारा वाटप करण्यात आला. बेळगावातील महावीर गोशाळेत दीडशेहून अधिक गायी आहेत. दुष्काळामुळे अनेक ठिकाणी जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण झाली होती. याची गांभीर्याने दखल घेत फेसबुक मित्र मंडळाने 11 पोती चारा व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यावेळी संतोष दरेकर, …

Read More »

बेकवाड येथील व्यक्तीने केला पत्नीचा खून! वास्को गोवा येथील घटना

  खानापूर : बेकवाड (ता. खानापूर) येथील पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार प्रहार करून खून केल्याची घटना वास्को-गोवा येथे शुक्रवारी दुपारी घडली. वैशाली चाळोबा केसरेकर (वय 39) असे महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती चाळोबा गुणाजी केसरेकर (वय 45) याला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, …

Read More »