Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

गोवावेसजवळ बंद पेट्रोलवरील शेडला अचानक आग

  बेळगाव : बेळगाव शहरातील खानापूर रोड वरील गोवावेस जवळ असलेल्या दत्त मंदिरच्या बाजूला असणाऱ्या पेट्रोल पंपवर आज भीषण आग लागली होती. बंद असलेल्या पेट्रोल पंपवरील बाजूच्या शेडला ही आग लागली असून अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या व त्यांनी आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी …

Read More »

शरीरसौष्ठवपटू गजानन गावडे याचा बेळगांव मायक्रो असोसिएशनने केला सत्कार

  बेळगाव : उद्यमबाग येथील कारखान्यात काम करणाऱ्या गजानन गावडे या कामगाराने जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट शरीरयष्टीचे दर्शन घडवीत सुवर्णपदक पटकाविले. बिकट आर्थिक परिस्थिती असूनही त्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी सांभाळत व्यायाम करून शरीरसौष्ठव स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवल्याने, त्याचा बेळगांव मायक्रो असोसिएशनच्यावतीने सन्मान करण्यात आला. बेळगांव मायक्रो असोसिएशन उद्यमबागचे …

Read More »

तरुणीच्या घरावर दगडफेक करणाऱ्या तरूणाला अटक

  बेळगाव : प्रेमप्रकरणातून किणये येथील तरुणीच्या घरावर दगडफेक करणाऱ्या तरुणाला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजले. यासंदर्भात बोलताना पोलीस आयुक्त इडा मार्टिन म्हणाले की, किणये गाबतीलक एका तरुणीच्या घरावर दगडफेक करून त्रास देणाऱ्या तिप्पण्णा डुकरे याला किणये गावातून अटक करण्यात आली आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल …

Read More »

माथेफिरू तरुणाचा प्रताप; प्रेयसीच्या घराच्या फोडल्या काचा!

  बेळगाव : हुबळी येथील नेहा हिरेमठ आणि अंजली अंबिगेर यांच्या हत्याकांडाचे पडसाद अद्याप ताजे असतानाच बेळगावातील किणये गावात अशाच प्रकारचे प्रेमप्रकरण घडल्याचे समोर आले आहे. किणये गावातील तरुणाने आपल्या आवडत्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याने आता पोलीस विभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. किणये गावातील तिप्पण्णा डुकरे (२७) याने …

Read More »

केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कहर; अनेक सेवा विस्कळीत

  मोसमी पाऊस ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस केरळमध्ये वेळेत दाखल होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यानंतर आता केरळमध्ये मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाला असून पावसामुळे अनेक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. तसेच केरळमधील …

Read More »

प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल : 50 पीडिता, 12 जणींवर बलात्कार; दाखल गुन्हे तीन

  बंगळूर : सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी तसेच हासनचा जेडीएस खासदार प्रज्वल रेवण्णा याच्यासोबत व्हिडीओत दिसणार्‍या 50 जणींशी संपर्क साधण्यात यंत्रणांना यश आले आहे. यापैकी 12 जणींवर बळजबरी झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असून, प्रत्यक्षात प्रज्वल याच्याविरोधात अद्याप केवळ 3 ठोस गुन्हे दाखल झालेले आहेत. लैंगिक छळ झालेल्या पीडितांमध्ये 22 ते …

Read More »

सिलेंडर स्फोटातील वृद्ध दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू

बेळगाव : सुळगा (हिं.) ता. बेळगाव येथे शनिवार दि. १८ मे रोजी सिलेंडरचा स्फोट होऊन वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले होते. मात्र शुक्रवार दि. २४ मे रोजी सायंकाळी खाजगी इस्पितळात दाम्पत्याचा मृत्यू झाला. शंकर गल्ली, सुळगा येथील रहिवासी कल्लाप्पा यल्लाप्पा पाटील (वय ६५) आणि त्यांच्या पत्नी सुमन कल्लाप्पा पाटील (वय …

Read More »

सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान; सहा राज्यांतील ५८ जागांचा समावेश

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज, शनिवारी सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ५८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. दिल्लीतील सर्व सात आणि हरियाणातील सर्व दहा जागांवर मतदान होणार असून सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. या ५८ मतदारसंघांमध्ये ११.१३ कोटी मतदार असून ५.८४ कोटी पुरुष व ५.२९ …

Read More »

सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनंतर फायनलमध्ये, फिरकी गोलंदाज ठरले मॅचविनर

  सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या फायनलमध्ये ऐटीत प्रवेश केला. राजस्थान रॉयल्सला त्यांनी क्वालिफायर २ मध्ये पराभूत केले. सहा वर्षांनी हैदराबाद आयपीएल फायनल खेळणार आहे आणि त्यांच्यासमोर बलाढ्य कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान आहे. शाहबाज अहमद व अभिषेक शर्मा या फिरकी गोलंदाजांना हैदराबादच्या विजयाचे श्रेय जाते. क्वालिफायर १ मध्ये …

Read More »

नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी

  सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना मोठा झटका बसला आहे. दिल्लीच्या साकेत न्यायालयाने शुक्रवारी (24 मे) 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवले आहे. तत्कालीन केवायआयसी चेअरमन व्हीके सक्सेना (आता दिल्लीचे नायब राज्यपाल) यांनी पाटकरांविरोधात याचिका दाखल केली होती. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, साकेत न्यायालयाचे …

Read More »