Monday , September 21 2026
Breaking News

मल्लिकार्जुन मंदिरामध्ये श्रावण मास निमित्त ज्ञानदासोह अंतर्गत अध्यात्मिक प्रवचन

Spread the love

 

कागवाड : मंगसुळी येथील श्रीमल्लिकार्जुन मंदिर येथे श्रावण मास निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानदासोह अंतर्गत प्रवचन सह अन्नदासोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेअसून या कार्यक्रमासाठी प.पू.108 श्रीगुरुशिवलिंग शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ संस्थान सिद्धेश्वर मंदिर बेळंकी, प पू. डॉ. शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ संस्थान म्हैसाळ यांचे दिव्य सानिध्यात संपन्न झाले. हा सर्व धार्मिक कार्यक्रम संपूर्ण श्रावण महिन्यात होणार होणार असून या कार्यक्रमाला मंगसुळी गावचे पोलीस पाटील अभयसिंग अशोकराव पाटील तसेच माजी ग्रामपंचायत चेअरमन चिदानंद मारुती माळी यांनी दीपप्रज्वलित करून कार्यक्रमाला चालना दिली.
यावेळी प्रवीण महादेव माळी, परशुराम माळी, राजू विश्वास माळी, मेजर विष्णू कर्नाळ, राम वसंत तट्टे, शिवानंद स्वामी, प्रभूलिंग स्वामी, परशुराम माळी मेजर, मल्लाप्पा कोष्टी, धनपाल कोष्टी, सुशांत माळी, कृष्णा माळी, गावकरी उपस्थित होते. या संपूर्ण श्रावण मास मध्ये प्रवचन धार्मिक सोहळा प्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी विनंती श्री मल्लिकार्जुन देवस्थान कमिटीने केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *