Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

आमचं सरकार आल्यानंतर प्रज्ज्वल रेवण्णाची जबाबदारी मोदींच्या गळ्यात बांधणार : उद्धव ठाकरेंचा घणाघात

  “प्रज्ज्वल रेवण्णाला मत म्हणजे मला मत, असं मोदींनी जाहीर सभेत सांगितले. मग त्यांनी केलेले गुन्हे तुमच्या माथी मारायचे की नाही? मारले पाहिजेत ना? तो रेवण्णा आज फरार झालेला आहे. इकडे साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरी, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घरी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या घरी तुम्ही रात्री अपरात्री पोलीस पाठवता. अजूनही दमदाटी सुरु आहे. …

Read More »

बेळगाव लोकसभा मतदारसंघात 71.38 टक्के तर चिक्कोडीत 78.51 टक्के मतदान

  बेळगाव : लोकशाहीचा सण असलेली निवडणूक शांततेत पार पडली असून चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ 78.51 टक्के तर बेळगाव लोकसभा मतदारसंघ 71.38 टक्के तसेच बेळगाव जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघात 73.87 टक्के आणि कॅनरा लोकसभा मतदारसंघातील कित्तूर विधानसभा मतदारसंघात 73.87 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. एकूण गतवेळच्या तुलनेत …

Read More »

अखिलेश यादव मंदिरातून बाहेर पडताच भाजपा कार्यकर्त्यांनी गंगाजलने स्वच्छ केला मंदिर परिसर

  समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोमवारी उत्तर प्रदेशाच्या कन्नौज येथील गौरी शंकर महादेव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली. मात्र, अखिलेश यादव मंदिरातून बाहेर पडताच भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी हे मंदिर गंगाजलने स्वच्छ केल्याचं पुढे आलं आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिया …

Read More »

“चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट”; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र

  अहमदनगर : भाजप, एनडीए आघाडीला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर येथील सभेत सांगितले. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी अहमदनगर येथे सावेडी …

Read More »

सिद्धरामय्या, परमेश्वर यांची सीडी बाहेर आल्यास आश्चर्य वाटणार नाही : माजी मंत्री आ. रमेश जारकीहोळी

  गोकाक : प्रज्वल रेवण्णा प्रकरण ही कोणाला अभिमान वाटेल अशी गोष्ट नाही. हे प्रकरण अत्यंत वाईट असल्याची नाराजी माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केली आहे. स्थानिक आमदार रमेश जारकीहोळी यांनी मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी गोकाक येथील लक्ष्मीदेवी मंदिरात पूजा केल्यानंतर मतदान केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आमदार रमेश जारकीहोळी …

Read More »

आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू

  धुणं धुण्यासाठी गेल्यानंतर काळाचा घाला कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. हिरण्यकेशी नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाला असून हे तिघेही एकाच कुटुंबातील होते. धुणं धुण्यासाठी कुटुंबातील सदस्य नदीकाठी आले असता ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार …

Read More »

एस. आर. मोरे यांचा नागरी सन्मान

बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एस. आर. मोरे यांच्या ८१ व्या यशस्वी कारकीर्दबद्दल नागरी सत्कार सोहळा आयोजन समिती बिजगर्णी -कावळेवाडी यांच्यावतीने १५ मे रोजी बिजगर्णी हायस्कूल येथे सकाळी दहा वाजता नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी (माजी आमदार), मालोजीराव अष्टेकर …

Read More »

बेळगाव मतदारसंघात ४०.७८ तर चिक्कोडी मतदारसंघात ४५.६९ टक्के मतदान

  बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज मंगळवारी सकाळी ७ वाजता बेळगावसह राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये प्रारंभ झाला असून दुपारी १ वाजेपर्यंत बेळगाव लोकसभा मतदारसंघात ४०.७८ तर चिक्कोडी मतदारसंघात ४५.६९ मतदान झाले. बेळगाव जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज सकाळी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला. विश्वेश्वरय्यानगर येथील …

Read More »

बेळगावात २४.०२ तर चिक्कोडीत २७.२३ टक्के मतदान

  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत २४.०२ टक्के तर चिक्कोडीत २७.२३ टक्के मतदान झाले आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील बेळगाव शहर परिसरात विविध ठिकाणी मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी मतदानाला सुरुवात केली आहे. मतदारांनी मतदानासाठी सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला आहे. वाढत्या उन्हामुळे वयोवृद्ध तसेच महिलांना मतदान केंद्राकडे जाण्यास त्रास …

Read More »

सूर्यकुमार यादवचे झंझावाती शतक; मुंबईचा हैदराबादवर ७ गड्यांनी विजय

मुंबई : सूर्यकुमार यादवच्या झंझावाती शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने ७ विकेट्सने हैदराबादवर विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने या विजयासह हैदराबादकडून मागील सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. सूर्यकुमार यादवने ५१ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकारांच्या जोरावर १०२ धावांची तुफान खेळी केली. एकटा सूर्याचं हैदराबादच्या संघावर भारी पडला आणि पराभवासह हैदराबादला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी …

Read More »