रेवण्णांना आणखी एक धक्का बंगळूर : प्रज्वल रेवण्णा यांचे अश्लील व्हिडिओ प्रकरण एच. डी. रेवण्णा यांच्या कुटुंबासाठी असह्य वेदना बनले आहे. रेवण्णा यांना अटक केल्यानंतर आज न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. रेवण्णाच्या वकिलाच्या युक्तिवादाला मान्यता मिळाली नाही. पुढील तपासासाठी न्यायाधीशांनी रेवण्णा यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे रेवण्णा यांना …
Read More »सागर बी. एड. महाविद्यालयातर्फे शहरात मतदान जनजागृतीपर प्रभातफेरी
बेळगाव : सागर शिक्षण महाविद्यालयाच्यावतीने (बी. एड.) नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य राजू हळब यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी चौकात प्रभातफेरीचे उदघाटन कऱण्यात आले. त्यानंतर किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाझार, शनिवार खुट मार्गे कित्तूर चन्नम्मा चौकात सागर बी.एडच्या प्रशिक्षणार्थींनी फेरीचा समारोप केला. …
Read More »प्रज्वल रेवण्णा विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी; गृहमंत्री परमेश्वर यांची माहिती
बंगळूर : हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा अश्लील व्हिडिओ प्रकरणात आणखी अडचणीत आले आहेत, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीच्या विनंतीनंतर सीबीआयने प्रज्वलविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली, लैंगिक छळ आणि अपहरणाचा आरोप असलेल्या प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडलचा शोध घेण्यासाठी …
Read More »कोलकाताचा लखनऊवर ९८ धावांनी मोठा विजय; पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी
लखनऊ : कोलकाता नाईट रायडर्सने लखनऊच्या घरच्या मैदानावर एलएसजी संघाचा ९८ धावांनी मोठा पराभव केला. केकेआरने दिलेल्या २३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊचा संघ १५० धावाही करू शकला नाही. लखनऊची फलंदाजी बाजू फेल ठरल्याने संघ १३७ धावांवरच ऑल आऊट झाला. संघाकडून सर्वाधिक ३६ धावांची खेळी मार्कस स्टॉयनिसने केली. त्याच्याव्यतिरिक्त …
Read More »कारवार लोकसभा मतदारसंघात समिती इतिहास रचेल : आबासाहेब दळवी
खानापूर : जोयडा तालुक्यातील मराठा समाज व मराठी भाषिकांची साथ मिळाल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठ्या प्रमाणात यश मिळणार आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका समितीचे सचिव आबासाहेब दळवी यांनी केले आहे. कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी रविवारी रामनगर, शिंगरगाव, वैजगाव आदी भागात प्रचार फेरी काढून …
Read More »कारवार येथे डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची भव्य दुचाकी रॅली
कारवार : मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतसा प्रचाराचा जोर वाढत आहे. काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज शनिवारी (ता.४) कारवार येथे भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्यासह आमदार सतिश सैल यांनी दुचाकी चालवून लक्ष वेधून घेतले. हजारो कार्यकर्त्यांनी रॅलीत …
Read More »मोदी सरकारने देशातील प्रत्येकाची फसवणूक केली : मुख्यमंत्री सिद्धरामय्या
बेळगाव : दहा वर्षांपूर्वी देशातील जनतेला विविध आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने देशातील प्रत्येकाची फसवणूक केली आहे. जाती धर्माच्या नावावर देशात तेढ निर्माण करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. देशाचे संविधान बदलण्याचा घाट मोदी सरकारने घातला आहे. यावेळची लोकसभा निवडणूक स्वातंत्र संग्रामाची दुसरी वेळ ठरली आहे. यासाठी लोकसभेच्या …
Read More »लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी भाजपाला रोखा
ॲड. अविनाश कट्टी; ऑल इंडिया रिपब्लिकन पक्षाची बैठक निपाणी (वार्ता) : देशात भाजपा सत्तेवर आल्यास भारतीय घटना बदलण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मागासवर्गीय, अल्पसंख्यांक आणि ओबीसीवर अन्याय होणार आहे. शिवाय भारतीय लोकशाही आणि घटना धोक्यात येणार आहे. त्यासाठी मतदारांनी जागरूकपणे मतदान करून भाजपला रोखले पाहिजे, असे आवाहन ऑल इंडिया …
Read More »देशाच्या ७ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा हवामान खात्याचा इशारा
नवी दिल्ली : हवामान खात्याने देशातील ७ राज्यांमध्ये पुढील ३ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा यांचा समावेश आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात दोन दिवसांनंतर उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसून येईल. अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. …
Read More »फॅशनेट स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने मतदान जनजागृती
बेळगाव : लिंगराज कॉलेजच्या कॅम्पस मधील केएलई संस्थेच्या जलतरण तलाव व फॅशनेट जलतरण स्पोर्ट्स अकादमी यांच्यावतीने मतदान जनजागृतीसाठी कॉलेजच्या आवारात व परिसरात मतदान जनजागृती रॅली करीत जनतेला शंभर टक्के मतदान करा असा संदेश देण्यात आला. प्रशासनाच्यावतीने स्वीप समितीच्या माध्यमातून मतदारांत यापूर्वी जागृती करण्यात आली आहे, आज रविवार तारीख 5 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta