Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

शिवाजी माने यांचा हातकणंगलेतून लोकसभेसाठी अर्ज दाखल

  निपाणी (वार्ता) : जय शिवराय किसान संघटना, कर्नाटक राज्य रयत संघटना जिद्द बांधकाम कामगार संघटना, बळीराजा पार्टी, विश्वकर्मा पांचाळ समाज संघटना या संघटनांतर्फे जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने यांचा लोकसभेसाठी हातकणंगलेतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी, देशातील जनता घराणेशाही व सध्याच्या राजकारणाला …

Read More »

ब्रेक निकामी झाल्याने कित्तूरजवळ बस उलटली!

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील तिम्मापुर गावाजवळ ब्रेक निकामी झाल्याने राजहंस बस उलटली. हुबळीहून बेळगावकडे येणारी राजहंस बस सर्व्हिस रोडवर रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेडवर उलटली. बसमधील दहाहून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले असून वीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read More »

पोलीसांची बंदोबस्तासाठी तारेवरची कसरत

  सीमाभागातील चित्र कोगनोळी : गावागावातील यात्रा, जत्रा, म्हाई, उरुस, सण, उत्सव, जयंती याचबरोबर सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यामुळे पोलीस प्रशासनावरील कामाचा ताण वाढू लागला आहे. पोलीसांची संख्या अपुरी असल्याने सगळीकडे बंदोबस्त ठेवण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे. रामनवमी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती …

Read More »

आयटी-बीटी कंपन्यांना होत्या टार्गेट..!

  संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीतून माहिती समोर बंगळूर : व्हाईटफिल्डच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटातील बॉम्बरसह दोन संशयित दहशतवाद्यांनी बंगळुरला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून देणाऱ्या आयटी, बीटी कंपन्यांवर बॉम्बहल्ला करण्याचा कट रचल्याची धक्कादायक बाब राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आली आहे. अब्दुल मतीन ताहा व मुसावीर हूसेन शाजीब या संशयित दहशतवाद्याना अटक …

Read More »

जोस बटलरचे तडाखेबंद शतक; राजस्थानने केली विक्रमी पाठलागाची बरोबरी

  जोस बटलरच्या शतकी कामगिरीच्या जोरावर राजस्थानने केकेआरचा २ विकेट्सने पराभव केला. कोलकाताने दिलेल्या २२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकटा जॉस बटलर कोलकाता संघावर भारी पडला. राजस्थानने २२४ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत पंजाब किंग्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. २२० च्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्सने ६ बाद २२० धावांचा यशस्वी पाठलाग …

Read More »

डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा आज खानापूर दौरा; निट्टुर, इदलहोंड, गर्लगुंजी गा. पं. ना देणार भेट!

  खानापूर : उत्तर कन्नड (कारवार) लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचा उद्या बुधवार दि. 17 रोजी खानापूर तालुक्यातील काही प्रमुख ग्रामपंचायतीना भेट देण्याचा दौरा होणार आहे. सकाळी 8 वाजता पहिली भेट निट्टुर ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांसाठी राहणार आहे. या ठिकाणी कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. …

Read More »

बेळगाव तालुक्यातील कलखांब गावचा सुपुत्र राहुल पाटील यांनी फडकवला युपीएससी परीक्षेत झेंडा…

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कलखांब या एका छोट्याशा खेड्यातील विद्यार्थी राहुल जयवंत पाटील याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित करून बेलगावकरांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. सुरवातीपासूनच एक हुशार विद्यार्थी म्हणून परिचित असलेला राहुल याने वनिता विद्यालय हायस्कूलमधून दहावी झाल्यानंतर आरएलएस कॉलेजमधून बारावी उत्तीर्ण झाला त्यानंतर …

Read More »

समर्थ नगर येथे अडीच दिवसाचे पारायण : श्री कपिलेश्वर देवस्थान येथून समर्थ नगर पर्यंत दिंडी मिरवणूक

  बेळगाव : श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळा मेन रोड समर्थ नगर येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दिनांक 15/4/2024 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता या दिंडी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. श्री कपिलेश्वर देवस्थान येथुन समर्थ नगर पर्यंत ही दिंडी मिरवणूक काढण्यात …

Read More »

निपाणीतील मॅराथॉन स्पर्धेत विवेक मोरे, वैष्णवी रावळ प्रथम

  निपाणी (वार्ता) : येथील जत्राट वेसमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात विवेक मोरे यांनी प्रथम क्रमांक मिळवून ११ हजाराचे बक्षीस पटकावले.तर महिला गटात वैष्णवी रावळ हिने प्रथम क्रमांक पटकावून २००१ रुपयांचे बक्षीस मिळवले. सामाजिक कार्यकर्ते जीवन घस्ते आणि शुभम माने यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन …

Read More »

प्रियांका जारकीहोळी गुरुवारी अर्ज भरणार

  चिकोडी : चिकोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी गुरुवारी (दि. १८) साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी नेते व लोकप्रतिनिधी हजर राहणार आहेत. सध्या उष्मा वाढल्याने कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ शकतो, अशी सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे. त्यामुळे, त्यांच्या मार्गदर्शनानुसार साध्या पद्धतीने मोजक्या …

Read More »