Friday , November 6 2026
Breaking News

शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकाऱ्याला गांजा तस्करी प्रकरणी तेलंगणा पोलिसांकडून अटक

Spread the love

 

मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांना तेलंगणा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातून नाशिक पोलिसांच्या मदतीने तेलंगणा पोलिसांनी लक्ष्मी ताठे यांना ताब्यात घेतले आहे. तेलंगाणाच्या दामेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 जून 2024 रोजी 190 किलो गांजा पकडला होता. याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

तेलंगणा अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली होती कारवाई
तेलंगाणा अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली होती. या प्रकरणात बीड आणि अहमदनगरच्या दोघा तस्करांना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान लक्ष्मी ताठेंच नाव पुढे आल्यानं 1 महिन्यानंतर तेलंगाणा पोलिसांनी अटक केली आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून स्पष्टीकरण

लक्ष्मी ताठेंना तेलंगणा पोलिसांकडून अटक करण्यात आल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने स्पष्टीकरण दिले आहे. लक्ष्मी ताठेंची या आधीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही, असं शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन

Spread the love    लावणीसम्राज्ञी काळाच्या पडद्याआड; मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *