Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त प्रदर्शन

  निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचालक येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान वस्तू प्रदर्शन भरवण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्राचार्या स्नेहा घाटगे तर प्रमुख पाहुणे म्हणून देवचंद कॉलेजचे प्रा. डॉ. भारत पाटील व डॉ. चंद्रकांत डावरे उपस्थित होते. विज्ञान दिनाचे औचित्य साधून पहिले ते दहावी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या …

Read More »

उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं

  सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियाशी केली होती तुलना! नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे. सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियाशी तुलना करून त्याच्या उच्चाटनासंदर्भात वक्तव्य करणाऱ्या स्टॅलिन यांनी यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळताना न्यायालयाने त्यांना परखड शब्दांत सुनावलं आहे. ‘तुम्ही …

Read More »

ढोणेवाडीत रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ओळखपत्राचे वाटप

  निपाणी (वार्ता) : ढोणेवाडी आणि परिसरात गजानन महाराज प्रकट दिन साजरा झाला. ढोणेवाडीत आयोजित कार्यक्रमास कर्नाटक राज्य रक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आप्पा महाराजांच्या मठात आयोजित कार्यक्रमात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी राजू पोवार यांनी आपला सहभाग नोंदवून स्वतः अभंगाचे एक चरण …

Read More »

बॉम्बस्फोट प्रकरणाचा सुगावा लागल्याचे गृहमंत्र्यांचे संकेत

  महत्त्वाची माहिती उपलब्ध झाल्याचा दावा बंगळूर : व्हाईटफिल्डच्या रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाची सर्व परिमाणात चौकशी केली जात असून काही महत्त्वाची माहिती उपलब्ध झाली आहे, असे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले. हे प्रकरण सीसीबीकडे सोपवण्यात आले आहे. विशेष पोलिस पथकाने तपास तीव्र केला आहे. एनआयए आणि एनएसजी पथकेही तपास …

Read More »

एस. आर. एस. हिंदुस्थान संघ आर. जी. पी. एल. चषकाचा मानकरी

  राजहंस गल्लीचा राजा संघ उपविजेता बेळगाव : एस. आर. एस. हिंदुस्थान संघ आर. जी. पी. एल. चषक – 2024 चा मानकरी ठरला असून राजहंस गल्लीचा राजा हा संघ उपविजेता ठरला आहे. राजहंस गल्लीचा राजा संघाने प्रथम फलंदाजी करत ४ षटकांच्या मोबदल्यात ३ गडी बाद २९ धावा जमवल्या. प्रतिउत्तरार्थ एस. …

Read More »

कन्नडसक्ती विरोधात रस्त्यावर उतरणार; मध्यवर्ती समितीच्या बैठकीत निर्णय

  बेळगाव : व्यापारी आस्थापने तसेच इतर माहिती फलक 60% कन्नड भाषा व 40 टक्के इतर भाषेत असले पाहिजेत अशी सक्ती कर्नाटक सरकारने सीमाभागात सुरु केली आहे. कर्नाटक सरकारने लागू केलेल्या या नियमामुळे कर्नाटक सरकार सीमावासियांवर एक प्रकारे अत्याचार करीत आहे. कर्नाटक सरकारने सीमावासियांवर कन्नडसक्ती तीव्र केल्यामुळे मराठी भाषिकांतून तीव्र …

Read More »

भाषेच्या जडणघडणीत लेखक कवींची भूमिका महत्त्वाची : डॉ. मैजुद्दीन मुतवल्ली

  शब्दगंध कवी मंडळातर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा बेळगाव : भाषेला श्रीमंती मिळवून देण्याचे कार्य कवी करीत असतात. भाषेच्या जडणघडणीत लेखक कवींची भूमिका महत्त्वाची असते. मराठी भाषेला हजारो वर्षांची परंपरा लाभली आहे. संतांनी, विचारवंतांनी, साहित्यिकांनी या परंपरेला घडवले आहे. असे असताना मराठी माध्यमाच्या शाळा मोठ्या प्रमाणात बंद पडू लागल्या …

Read More »

सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा आदर्श शाळा पुरस्कार

  येळ्ळूर : मराठा मंदिर येथे आयोजित महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या आदर्श शाळा पुरस्कार व सामान्यज्ञान परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये 2023-24 सालातील पाच मतदारसंघातील आदर्श शाळा निवडण्यात आल्या होत्या. यामध्ये सरकारी मराठी उच्च प्राथमिक आदर्श शाळा येळ्ळूर या शाळेला सलग तिसऱ्यांदा आदर्श शाळा पुरस्कार म्हणून बेळगाव …

Read More »

प्राथमिक शाळा टिकली तरच मराठी टिकणार : प्रा. आनंद मेणसे

  युवा समितीतर्फे सामान्यज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बेळगाव : ‘मराठी भाषेचा आत्मा हा प्राथमिक मराठी शाळा आहेत. याकडे सरकार व समाजाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. शाळा टिकली तर मराठी टिकणार आहे. बेळगावात अनेक मराठी शाळा बंद पडत आहेत. या स्थितीला आपणच जबाबदार आहोत. ही स्थिती बदलण्यासाठी आपणच प्रयत्न केले …

Read More »

मराठा समाज सुधारणा मंडळाचा 10 मार्चला वधूवर मेळावा

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दि. 10 मार्च रोजी वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. रेल्वे ओव्हर ब्रिजजवळील मराठा मंदिर येथील सभागृहात सकाळी 10.30 वाजता मेळाव्यास प्रारंभ होणार आहे. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्यास भरघोस प्रतिसाद लाभतो. तरी इच्छुक वधू-वर व पालकांनी नाव नोंदणी न केल्यास …

Read More »