Friday , September 20 2024
Breaking News

महाराष्ट्रासाठी मंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला?; नितीश कुमार अन् चंद्राबाबूंना ‘मोठं पॅकेज’

Spread the love

 

नवी दिल्ली : देशातील लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीए आघाडीने बहुमताचा आकडा गाठला असून इंडिया आघाडीनेही आपण सरकार स्थापन करणार नसल्याचे म्हटले आहे. तर, आपल्याकडे स्पष्ट बहुमत असल्याने आपणच सरकार स्थापन करणार आहोत, असे भाजप नेत्यांनी म्हटलं आहे. त्यानुसार, आता भाजपच्यावतीने शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. 9 जून रोजी मोदी पंतप्रधानपदासाठी शपथ घेतील, अशी माहिती आहे. दरम्यान, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेना शिंदे गटाला 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 मंत्रिपद देण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर, चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनही मोठं पॅकेज दिलं जाणार असल्याचे समजते.

बिहारमधील जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएनला समर्थन पत्र दिलं आहे. त्यामुळे, जवळपास मोदींच्या शपथविधीचं निश्चित झालं आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रफुल्ल पटेल यांनीही आपल्या पक्षाचं समर्थन पत्र दिलं आहे. त्यामुळे एनडीए लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. सर्वाचं समर्थन आणि सह्या घेण्याचं काम सुरू भाजपाकडून सुरू आहे. विशेष म्हणजे भाजपसमवेतच्या सर्वच घटकपक्षांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार आहे.

नरेंद्र मोदी यांचा शपथविधी 9 जून रोजी दिल्लीमध्ये पार पडणार आहे. 7 आणि 8 जूनला अजित पवार दिल्लीत एनडीएच्या बैठकीसाठी जाणार आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आज दिल्लीमध्ये एनडीएची सत्तास्थापनेसाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी हजेरी लावली.

4 खासदारांमागे 1 मंत्रीपद

एनडीए सरकारच्या मंत्रीमंडळाचे संभाव्य जागावाटप ठरल्याची माहिती आहे. देशातील महत्त्वाचे 4 खाते भाजप स्वत:कडेच ठेवणार आहेत. तर, प्रत्येकी 4 खासदारांच्या मागे एक कॅबिनेट मंत्रीपद असा फॉर्म्युला भाजपने ठरवला आहे. त्यानुसार, नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्षाला तीन मंत्रीपद, राष्ट्रीय लोकजन शक्ती पक्ष राम विलास या पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्या पक्षाला 1 कॅबिनेट मंत्रीपद, बिहारमधील जिंतनराम मांझी यांच्या हिंदुस्थान आवामी मोर्चा पक्षाला 1 कॅबिनेट मंत्री पद, तर चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाला 4 कॅबिनेट मंत्रीपद दिली जाणार आहेत.

शिंदेंना 2 तर अजित पवारांना 1 मंत्रीपद

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री पद देण्यात येणार असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला 1 मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे समजते. यांसह, अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल पक्षाला 1 कॅबिनेट मंत्री पद, आरएलडी पक्षाचे प्रमुख जयंत चौधरी यांच्या पक्षाला एक कॅबिनेट, आणि जनसेवा पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांच्या पक्षालाही 1 मंत्रीपद देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

About Belgaum Varta

Check Also

मडगावात ‘हसत खेळत काव्य’तर्फे कविसंमेलन उत्साहात

Spread the love  मडगाव : शनिवार दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी हसत खेळत काव्य संस्थेचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *