नवी दिल्ली : काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेरची मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती मुर्म यांची भेट घेत पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मंत्रिमंडळानेही राजीनामा दिला. काळजीवाहू पंतप्रधान मोदींनी सत्ता स्थापनेचा दावा केलाय. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी २१ पक्षांनी समर्थन पत्र दिले आहे.
Read More »नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ठेवल्या चार मोठ्या मागण्या
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यावेळी भाजप बहुमतापासून थोडक्यात हुकली आहे. या निकालानंतर नितीश कुमार हे किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत. यातच नितीश कुमार हे बिहारच्या विकासाच्या अजेंड्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोरदार सौदेबाजी करण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांनी …
Read More »नरेंद्र मोदी यांनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि 17वी लोकसभा विसर्जित करावी, असे पत्र सादर केले. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 17वी लोकसभा विसर्जित करण्याची …
Read More »सरकारच्या जबाबदारीतून मला मोकळ करावे; देवेंद्र फडणवीसांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांना सरकारमधून बाहेर पडायचे असून त्यांनी उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला कमी जागा आल्या. राज्यातील पराभवाची जबाबादारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीमाना देण्याची तयारी दर्शवली आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षातील नेत्यांनी वरपासून ते खाली तळापर्यंत मेहनत घेतली. मात्र …
Read More »विमल फाउंडेशनच्यावतीने वृक्षारोपण
बेळगाव : पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भाजप नेते आणि विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण जाधव यांनी परिसरात वृक्षारोपण करून ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश दिला. जीवनात प्रत्येकाने एक तरी रोपटे लावून ते जगावावे. पर्यावरण ढासळत चालले असून समतोल राखण्यासाठी संघ-संस्थानी किमान आपापल्या भागात झाडे लावावीत आणि …
Read More »वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टीला बोलावून मित्राचा खून
बेळगाव : वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने मित्राला घरी बोलावून त्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना यरगट्टी तालुक्यातील नुगानट्टी गावामध्ये घडली आहे. सदर घटना मंगळवारी घडली असून या खूनाचा उलगडा बुधवारी सकाळी झाला. मृत युवकाचे नाव बसवराज गुरुलिंगप्पा मुद्दण्णवर (वय 23) असे आहे. वैयक्तिक भांडणांमधून हे कारस्थान करण्यात आल्याची माहिती देण्यात …
Read More »८ जूनला होणार मोदी सरकारचा शपथविधी?
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक निकालानंतर आता देशामध्ये कोणाचे सरकार स्थापन होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीकडून सरकार स्थापन करण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. अशामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. नरेंद्र मोदी आजच सत्ता स्थापनेसाठी दावा करणार आहे. मित्रपक्षांसोबतच्या बैठकीमध्ये भाजप …
Read More »राष्ट्रीय महामार्गावर वृक्षारोपण कधी?
वाहनधारकांना त्रास; प्राधिकरणाने वृक्ष लागवड करण्याची मागणी ; जागतिक पर्यावरण दिन विशेष निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर सध्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. याशिवाय रस्त्यावरील गावाजवळ उड्डाणपूल उभारणीचे काम चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर वर्षांपूर्वीच रस्त्याकडेची झाडे तोडली आहेत. मात्र या राष्ट्रीय महामार्गाच्या महामार्ग प्राधिकरणाने पावसाळ्यापूर्वी वृक्ष …
Read More »मराठा इन्फन्ट्रीमध्ये अग्निवीर जवानांचा दीक्षांत समारोह
बेळगाव : मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमधून अग्निवीर जवानांची तिसरी तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली असून आज अग्निवीर जवानांचा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. ३१ आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर बेळगावमधील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमधून ५६० अग्निवीर प्रशिक्षणार्थींना देशसेवेची शपथ देण्यात आली. यावेळी दीक्षांत संचलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ब्रिगेडियर जॉयदीप …
Read More »श्री सद्गुरु सदानंद महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांना सुरुवात
बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान राजहंस गल्ली, अनगोळ यांच्यातर्फे श्री सद्गुरु सदानंद महाराज यांच्या 93 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त उद्या बुधवार दि. 5 ते शुक्रवार दि. 7 जून 2024 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. श्री सद्गुरु सदानंद महाराज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta