कोल्हापूर : सिंधुदुर्गमधील पुतळ्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट आरोपी चेतन पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आलेला. त्यानंतर चेतन पाटीलच्या कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथील घरी जात पोलिसांनी चौकशी देखील केली होती. अशातच आता चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. चेतन पाटील याला …
Read More »शरद पवार 2 सप्टेंबर रोजी बेळगावात; कै. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार
बेळगाव : कै. अर्जुनराव घोरपडे जन्मशताब्दी समारंभाच्या तयारीसाठी आज सायंकाळी पाच वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे स्वागत समितीची बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. बाळाराम पाटील हे होते. बैठकीच्या सुरुवातीस श्री. नितीन आनंदाचे यांनी गेल्या बैठकीच्या इतिवृत्ताचे वाचन केले. यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तालुका अध्यक्षपदी निवड झालेल्या श्री. …
Read More »शिवकुमारांच्या चौकशीची सीबीआयची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
बंगळूरू : बेकायदेशीर संपत्ती प्रकरणी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध चौकशीला परवानगी देण्याची सीबीआयची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. उच्च न्यायालयाने सीबीआय आणि भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नल यांच्या याचिका फेटाळल्या आहेत. काँग्रेसचे प्रमुख नेते शिवकुमार यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत सीबीआय चौकशीसाठी कर्नाटक सरकारची संमती रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान …
Read More »मुडा प्रकरण : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अर्जाची सुनावणी शनिवारपर्यंत स्थगित
बंगळूरू : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) च्या जागा वाटप घोटाळ्यात खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयाने ३१ ऑगस्ट (शनिवार) पर्यंत पुढे ढकलली आहे. या खटल्यातील लोकप्रतिनिधींच्या तक्रारींची सुनावणी घेणाऱ्या लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाला पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत कामकाज पुढे ढकलण्याचे निर्देश …
Read More »रेणुकास्वामी खून प्रकरणः आरोपी प्रदोष हिंडलगा कारागृहात
बेळगाव : रेणुकास्वामी खून प्रकरणातील A14 आरोपी प्रदोषला बेंगळुरू येथून बेळगाव हिंडलगा कारागृहात हलवण्यात आले आहे. या हत्याकांडातील १४ वा आरोपी प्रदोष कारागृहात ब्लँकेट आणि बॅग घेऊन आला असता, या बॅगेत सिरप ही आढळून आले. दोन बॅगमधील कपडे आणि साहित्य तपासल्यानंतर हिंडलगा तुरुंगातील कर्मचाऱ्यांनी प्रदोषला आत सोडले.
Read More »निपाणी नगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता
नाट्यमय घडामोडीने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेपासून दूर निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निपाणी नगरपालिकेवर बालेकिल्ला अबाधित राखण्यात भाजपाला यश आले आहे. नगराध्यक्षपदी भाजपाच्या नगरसेविका सोनल राजेश कोठडीया यांची तर उपनगराध्यक्षपदी संतोष हिंदुराव सांगावकर यांची निवड झाली. यामध्ये कोठडीया व सांगावकर यांना १७ तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार …
Read More »तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी मनोहर किणेकर यांची निवड
बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी निवडण्यासंदर्भात आज कार्यकारिणी सदस्यांची महत्वपूर्ण बैठक मराठा मंदिर येथे पार पडली व नवीन पदाधिकारी निवडण्यात आले. बेळगाव तालुका म. ए. समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माजी आमदार मनोहर किणेकर यांच्याकडे सर्वांनुमते सोपविण्यात आली. नूतन पदाधिकारी खालीलप्रमाणे अध्यक्ष : मनोहर किणेकर. कार्याध्यक्ष : आर. …
Read More »गणेश चतुर्थी आणि ईद-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव : श्रीगणेश चतुर्थी आणि ईद-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना आगामी उत्सव काळात घ्यावयाच्या खबर्दारीसंदर्भात सूचना देण्यात आल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही सणासुदीत शांतता व सुव्यवस्था राखणे तसेच जनतेच्या समस्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. एडीजीपी आर. हितेंद्र यांनी, सण कसे साजरे केले पाहिजेत, …
Read More »ग्रामीण विकास योजनेतून अनेक कार्यक्रम
बेळगाव : धर्मस्थळ धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास योजनेंतर्गत अनेक कार्यक्रम करत असल्याचे ज्येष्ठ वकील जी. आर. सोनेर यांनी सांगितले. हिंडलगा गणेश सभाभवन येथे श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम विकास प्रकल्पाच्या स्वयंअर्थसहाय्यित संस्थांतर्फे सामूहिक श्रीवरमहालक्ष्मी पूजन व पदग्रहण कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. श्रावण महिन्यात वरमहालक्ष्मीची सामुहिक …
Read More »सुभाषचंद्र नगरात श्रावण उत्सव साजरा
बेळगाव : नवी पिढी संस्कृती, सणवार विसरत चालली आहे हे लक्षात घेऊन सुभाषचंद्रनगरातील महिला, मुली व लहान मुलांना एकत्रित करून त्यांना हिंदू संस्कृतीतील उत्सवांची माहिती द्यावी या उद्देशाने सुभाषचंद्र नगर महिला मंडळाच्या वतीने समुदाय भवनांमध्ये नुकताच श्रावण उत्सव साजरा केला. श्रावण महिन्यातील सोमवारची शंकराची पूजा, मंगळागौरीची पूजा, नागपंचमी, नारळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta