Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

खानापूरात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाला तरूणांनी वाचविले

  खानापूर : जीवनाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्धाला वाचवण्यात खानापूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांना यश आले. बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास खानापूर नगरपालिकेजवळील पुलावरील पायऱ्यांवरून मलप्रभा नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब लक्षात येताच शेडेगाळी गावचे सामाजिक कार्यकर्ते राजू गुरव, रुमेवाडी येथील प्रभाकर सुतार, करंबळ येथील मारुती …

Read More »

नौदलाची गुप्त माहिती फोडणाऱ्या तिघांना एनआयएकडून अटक

  बंगळुरू : एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आज उत्तर कन्नड जिल्ह्यात छापे टाकले. कारवार तालुक्यातील मुदगा, तोडुरू, कुमठा हनेहळ्ळी या गावांमध्ये एनआयएने छापा टाकला. नौदल तळाचा फोटो असल्याची गुप्त माहिती समोर आल्यानंतर एनआयए अधिकाऱ्यांनी नौदल तळावरील तिघांची चौकशी केली. २०२३ मध्ये दीपकला एनआयएने हैदराबादमधून अटक केली होती. दीपकच्या चौकशीत स्फोटक माहिती समोर …

Read More »

बेळवट्टी विद्यालयात सत्कार, दत्तक योजना कार्यक्रम उत्साहात

  बेळगाव : बेळवट्टी येथील विश्व भारत सेवा समितीच्या माध्यमिक विद्यालयात नुकताच गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार तसेच विद्यार्थी दत्तक योजना कार्यक्रम उत्साहात पार पडला. माजी विद्यार्थी संघटना, ईमारत बांधकाम कमिटी आणि माध्यमिक विद्यालयाच्या वतीने संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक यु. एस. होनगेकर होते. संस्थेचे अध्यक्ष विजयराव …

Read More »

खानापूर तालुक्यातील मळव गावात शर्यतीच्या बैलाचा पाण्यात बुडून मृत्यू 

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मळव या गावात शर्यतीच्या बैलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. याबाबत समजलेली माहिती अशी की, मळव गावातील गणपती पारशेकर हे आपली बैले धुण्यासाठी तलावात गेले होते. रस्त्याच्या कडेला एका दगडाला बैलाला बांधून दुसऱ्या बैलाला धूत असता अचानकपणे रस्त्यावरील गाडीचा हॉर्न वाजला आणि दगडाला बांधलेला बैल उधळला …

Read More »

जिल्हाशिक्षणाधिकारी पदी लीलावती हिरेमठ यांची नियुक्ती

  बेंगळुरू : राज्य सरकारने बेळगावच्या सार्वजनिक शिक्षण विभागाच्या उपसंचालक पदासह विविध पदांवर नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले आहेत. लीलावती शिवय्या हिरेमठ यांची बेळगाव जिल्हाशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. जिल्हाशिक्षणाधिकारी हे पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त होते. उपसंचालक बेंगळुरू आयुक्त कार्यालय म्हणून …

Read More »

पाठिंब्याबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय; नगरसेवक विलास गाडीवड्डर यांची माहिती

  निपाणी (वार्ता) : राजकीय नेत्यांनी अहंकार न बाळगता सर्वसामान्यांची कामे करावीत. आपण पालकमंत्र्यांची बेळगाव येथे भेट घेऊन काँग्रेस पक्ष वाढवणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यावेळी पालकमंत्र्यांनी कोणत्याही कामासाठी आपल्याशी थेट संपर्क ठेवण्याचे सांगितले. मात्र नगरपालिकेत काँग्रेस पुरस्कृत आघाडी करण्याच्या आपल्या मागणीसंदर्भात पालकमंत्र्यांकडून अद्याप कोणताही प्रतिसाद नाही. पुन्हा एकदा पालकमंत्र्यांशी चर्चा …

Read More »

आता बस्स झालं… मी निराश आणि भयभीत आहे : राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांची खंत

  नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकाता येथील रुग्णालयात महिला डॉक्टरावर बलात्कार आणि हत्येच्या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. द्रौपदी मुर्मू यांनी पीटीआयला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केले. कोलकाता सारख्या घटना आता बस्स झाल्या. मी निराश आणि भयभीत आहे, असे द्रौपदी मुर्मू म्हणाल्या आहेत. या घटनेमुळे …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रकरणाची करू चौकशी : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : रस्ता बांधकामात ज्यांची जमीन गेली त्यांना २० कोटी रुपयांची भरपाई देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या कालावधीत कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा पालक मंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. ते आज बेळगावात माध्यमांशी बोलत होते. बेळगावमधील शहापूर येथील …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय समूहगीत स्पर्धा अपूर्व उत्साहात संपन्न

  एम्. व्ही. हेरवाडकर स्कूलची प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी निवड बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने आंतरशालेय राष्ट्रीय समूहगीत स्पर्धा संत मीरा विद्यालयाच्या माधव सभागृहात अपूर्व उत्साहात पार पडली. उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश व लोक अदालतचे चेअरमन अजित सोलापूरकर तसेच दुपारच्या सत्रात पारितोषिक वितरण समारंभाला समाजसेवक व आनंद ॲडव्हर्टायझिंगचे …

Read More »

मंजुनाथ स्वामींचे अध्यात्मिक प्रवचन आजही; सकल मराठा समाजाचे आवाहन

  बेळगाव : मंगळवारी झालेल्या बेळगाव येथील हिंदवाडी घुमटमाळ मंदिरात श्रावण मासानिमित्त आयोजित मराठा जगद्गुरु वेदांताचार्य परमपूज्य श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजी गोसाई महासंस्थान मठ भवानी दत्त पीठ गवीपुरम बेंगलोर यांच्या आध्यात्मिक प्रवचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बुधवारी ही या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडी बुधवार …

Read More »