Thursday , June 4 2026
Breaking News

माजी महापौर सौ. नीलिमा चव्हाण यांचे हृदयविकाराने निधन

Spread the love

 

बेळगाव : भाग्यनगर क्रॉस 6 च्या निवासी, म. ए समितीच्या कार्यकर्त्या आणि बेळगावच्या माजी महापौर सौ. नीलिमा संभाजी चव्हाण (वय 60).यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती माजी नगरसेवक संभाजीराव चव्हाण, दोन कन्या व एक मुलगा असा परिवार आहे.

गुरुवारी सायंकाळी 7 वा. चिदंबरनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. इ. स. 2002-2003 या काळात बेळगावच्या महापौर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांचा अनेक सामाजिक संस्थांशी निकटचा संबंध होता. सध्या त्या अहिल्यादेवी सोसायटीच्या चेअरमन होत्या.

About Belgaum Varta

Check Also

श्री ब्रह्मचैतन्य रुग्ण सेवा फाउंडेशनचा उद्घाटन सोहळा उत्साहात

Spread the love  बेळगाव : गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *