Friday , December 19 2025
Breaking News

Belgaum Varta

येळ्ळूरला छत्रपती श्री शिवाजी महाराज अश्वारूढ पंचधातूमूर्तीचा लोकार्पण सोहळा उद्या

  येळ्ळूर : हिंदवी स्वराज्य युवा संघटना व येळ्ळूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून येळ्ळूर गावच्या मधोमध असलेल्या महाराष्ट्र चौकामध्ये अश्वारूढ शिवपुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र चौक येळ्ळूर येथे उद्या रविवार (ता. 25) रोजी सकाळी सकाळी 10:00 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात होणार आहे. हा लोकार्पण सोहळा कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती …

Read More »

बेल्काॅन आणि ऑटो एक्स्पोचा उद्या शेवटचा दिवस

  बेळगाव : क्रेडाई आणि यश इव्हेंट्स यांनी गेल्या 22 फेब्रुवारीपासून येथील सीपीएड मैदानावर सुरू केलेल्या बेल्कॉन या बांधकाम व्यवसायाशी संबंधित आणि ऑटो एक्स्पोचा या सर्व प्रकारच्या वाहनासंदर्भात सुरू केलेल्या प्रदर्शनाला समस्त बेळगावकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. असे असले तरी रविवार हा प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. शनिवारी विविध स्पर्धांचे आयोजन या …

Read More »

यरमाळ येथे स्वखर्चातून पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका खुदाई

  बेळगाव : गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे यावर्षी सर्वांना पाणी टंचाईचा तीव्र सामना करण्याची वेळ आली आहे. अशा वेळी बांधकाम व्यवसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांनी स्वखर्चातून चार गावांना टँकरव्दारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याचबरोबर देसूर आणि यरमाळ गावासाठी स्वखर्चातून कुपनलिका खोदून दिलेल्या आहेत. आज शनिवारी यरमाळ …

Read More »

सोनट्टीत 12 लाख रुपये किंमतीची 5,700 लिटर हातभट्टीची दारू जप्त

  बेळगाव : बेळगावजवळच्या डोंगराळ भागातील सोनट्टी गावात धाडसी मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात हातभट्टीच्या गावठी दारूचा साठा जप्त केला. डीसीपी रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने 12 लाख रुपये किंमतीची 5,700 लिटर हातभट्टीची दारू जप्त केली. बेळगाव शहराजवळील डोंगराळ भागातील सोनट्टी गावात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारू गाळण्याचा …

Read More »

युवा समितीतर्फे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने प्रति वर्षीप्रमाणे २०२३ -२४ सालचे युवा समिती आदर्श शाळा पुरस्कार खालील शाळांना जाहीर करीत आहोत. इंग्रजी शिक्षणाकडे सर्वांची ओढ असून देखील पुरस्कार प्राप्त शाळांनी आधुनिक शिक्षण पद्धती अवलंबत मातृभाषेतून शिक्षण देत असताना वेगवेगळे प्रयोग आणि उपक्रम आपल्या शाळेत राबविले आहेत, या शाळांमध्ये …

Read More »

ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटून 7 मुलं, 8 महिलांसह 15 जणांचा मृत्यू

  भीषण अपघाताने यूपी हादरली लखनऊ : उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. माघी पौर्णिमेनिमित्त गंगास्नानासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पलटी होऊन भीषण दुर्घटना घडली. या मोठ्या दुर्घटनेत 7 मुलांसह तब्बल 15 भाविकांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी हा हादरवून सोडणारा अपघात झाला. ट्रॅक्टरचालकाचं नियंत्रण …

Read More »

रायगडावर ‘तुतारी’चे नाद घुमले, शरद पवार गटाच्या चिन्हाचं अनावरण

  रायगड : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं स्वागत केलं. या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, …

Read More »

निपाणीतील बौद्ध धम्म परिषदेची तयारी पूर्ण

  सुधाकर माने यांची माहिती; दोन सत्रात होणार कार्यक्रम निपाणी (वार्ता) : निपाणी येथे रविवारी (ता.२५) अकोळ रोड वरील राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवन समोर दोन सत्रात बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती स्वागताध्यक्ष सुधाकर माने यांनी दिली. माने म्हणाले, धम्म परिषदेच्या …

Read More »

बोरगावमध्ये कीर्तीस्तंभाचे लोकार्पण; सोहळ्यानिमित्त ११० मुलांचे मौजीबंधन

  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील महावीर सर्कल येथे काही महिन्यांपासून उभारण्यात येत असलेल्या कीर्तीस्तंभाचे लोकार्पण सोहळा पार पडला. संस्कार शिरोमणी आचार्य रत्न श्री १०८ कुलरत्नभूषण मुनी महाराज व १०८ श्री उत्तमसागर मुनी महाराज, यजमान धर्मानुरागी, सहकाररत्न उत्तम पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब हावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा …

Read More »

श्री समादेवी वार्षिक उत्सवानिमित्त नवचंडिका होम, महाप्रसाद उत्साहात संपन्न

  बेळगाव : बेळगाव शहरातील जागृत देवस्थान असलेल्या समादेवी गल्लीतील श्री. समादेवी वार्षिक जन्मोत्सवाच्या शुक्रवारी चौथ्या दिवशी श्रीला महाअभिषेक आणि नवचंडिका होम मोठ्या भक्तिभावाने करण्यात आला. श्री समादेवी मूर्तीला गौतम भटजी रामकृष्ण भटजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीला महाभिषेक घालण्यात आला. सकाळी ६:३० ते सकाळी 11 पर्यंत नागेश शास्त्री हेर्लेकर, निळकंठ हेर्लेकर, …

Read More »