खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव खानापूर हद्दीवरून गर्लगुंजी ते राजहंसगड क्राॅस पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावापासून ते बेळगाव तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या रस्त्याचे डांबरीकर आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी पूर्ण केले. परंतु बेळगांव हद्दीतील राजहंसगड क्राॅस पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
दोन तालुक्याच्या मधील रस्त्याची दुरावस्था झाल्याने केवळ अर्धाकिलोमिटर अंतर प्रवास करणे नागरीकाना तसेच वाहन चालकाना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
बेळगांव ग्रामीण भागाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी प्रवाशी वर्गातुन होत आहे.
बेळगांव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व खानापूर तालुक्याच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर हे दोन्हीही आमदार एकाच काँग्रेस पक्षाचे आहेत.
तेव्हा एकमेकाच्या सल्ल्याने या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta