बेळगाव : मध्यप्रदेश शिवपुरी येथील सरस्वती विद्यापीठ आवासीय विद्यालय शाळेच्या मैदानावर विद्याभारती अखिल भारतीय संघटना आयोजित अखिल भारतीय स्तरावरील प्राथमिक व माध्यमिक मुला- मुलींच्या हँडबॉल स्पर्धेसाठी दक्षिण मध्यक्षेत्रचे प्रतिनिधित्व करीत सहभाग होणाऱ्या अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळांचे हँडबॉल संघ रवाना झाले आहे.
सदर स्पर्धा 21 ते 24 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत संत मीरा प्राथमिक मुलांच्या संघात सोहल विजापूरे निरंज घाडी, वेदांत गुरव, श्रेयस खांडेकर, श्रेयस किल्लेकर, मनीष शेट्टी, उत्कर्ष कणसे, स्वराज लगाडे, वीर लगाडे, धैर्य वर्मा, रोहन करेगार, पृथ्वीराज बजंत्री.
प्राथमिक मुलींच्या संघात ऐश्वर्या पत्तार, वर्षा परीट, शिवानी घोडेकर, मेघा कलखांबकर, हिंदवी शिंदे, प्रणाली मोदगेकर, स्वाती फडनाडी, ऋतिका हलगेकर, भावना बेर्डे, मनस्वी चतुर, सान्वी कुलकर्णी,
माध्यमिक मुलांच्या संघात निशांत शेट्टी लिंगेश नाईक प्रथमेश शहापूरकर, अभिषेक गिरीगौडर, प्रणव चौगुले, श्रीनाथ सांबरेकर, कृष्णन्द्र कुलकर्णी, विघ्नेश दिवटे, प्रणव चौगुले, सिद्धांत वर्मा, राकेश मलतवाडी, अंकित कणवा, प्रसाद दिंडे माध्यमिक मुलींच्या संघात भावना कौजलगी, आदिती पाटील, अमृता करेगार, रितुषा जवरूचे, चैत्रा दास, वृत्तिका बांदेकर, दिशा जोशी, सृष्टी तडकोड, समीक्षा बुद्रुक, प्रणिता मजुकर, साक्षी पाटील, स्नेहा धनवडे यांचा संघात समावेश असून या संघासमवेत प्रशिक्षक शिवकुमार सुतार, यश पाटील, विशाल बेर्डे, क्रीडाशिक्षिका मयुरी पिंगट, सुप्रिया हिंदोळे, बसवंत पाटील हे रवाना झाले आहेत. या संघाला शाळेचा माजी विद्यार्थी ओमकार देसाई, एकरा नाईक, डॉ, हरिष पाटील यांनी संघाला टी-शर्ट व ट्रॅक सूट देणगी दाखल दिले तसेच विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सहसचिव सुजाता दप्तरदार, विद्याभारती जिल्हा अध्यक्ष माधव पुणेकर, संतमीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, उपमुख्यद्यापिका ऋतुजा जाधव, चंद्रकांत पाटील यांनी संघाला शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta