Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगावात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : गोवा बनावटीची दारू जप्त

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हलगा गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय महामार्गाशेजारील एका शेडमध्ये अवैधपणे साठवून ठेवलेला लाखो रुपये किमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एका आरोपीला नोटीस बजावण्यात आली आहे.

बेळगाव तालुक्यातील हलगा गावच्या हद्दीत उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली. हिरेबागेवाडी ते मुत्नाळकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ४ च्या सर्व्हिस रोडवरील एका पत्र्याच्या शेडवर निरीक्षक दुंडप्पा हक्की यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकली. यावेळी विक्रीच्या उद्देशाने साठवलेली ५५३.९६ लिटर गोवा बनावटीची दारू आणि २३.४०० लिटर बिअर असा एकूण ३,७७,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणासंदर्भात मुत्नाळ येथील अरुण राजू वाघमोरे या २१ वर्षीय तरुणाला बीएनएसएस कायद्यांतर्गत चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली असून, शेड मालकाचा शोध सुरू आहे. कर्नाटक उत्पादन शुल्क कायदा १९६५ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण कारवाईचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईत उपअधीक्षक रवी एम. मुरगोड आणि सुनील पाटील सहभागी झाले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात एकाच वेळी १२०० शाळांमध्ये बाल हक्क आणि कायद्याची जनजागृती

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच बालकांच्या कायदेशीर हक्कांबाबत जनजागृती करण्यासाठी ७ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *