
बेळगाव : कावळेवाडी येथील संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ व भजनी मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही तुकाराम बीज पासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याची मूहूर्त मेढ तेवीस फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न. 4 मार्च रोजी ज्ञानेश्वर महाराज मूर्ती व तुकाराम महाराज मूर्तीची गावातून टाळ मृदुंगच्या जयघोषात दिंडी काढण्यात आली.
या प्रसंगी हभप मारुती पाटील, जोतिबा मोरे, संजय ओऊळकर, मारुती रा। बाचीकर, गंगुबाई य. मोरे, भरमाणा मोरे, लक्ष्मण जाधव, वाय पी नाईक, पांडुरंग मोरे, हभप श्रीधर पाटील (हंगरगा, मृदुंग वादक), परशराम पाटील (सावगाव), मोणापा मोरे, काशिनाथ मोरे, भावकाणा गावडा, आदी मान्यवर उपस्थित होते.
5 मार्चला अधिष्ठान हभप मारुती पाटील, उप अधिष्ठान हभप शिवाजी जाधव महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवचन हभप यल्लापा लोहार (आंबेवाडी) किर्तन निरुपण यल्लापा पाटील महाराज (सावगाव). 6 मार्चला महिला भजनी मंडळ, हरिपाठ, रात्री दीपोत्सव मोहन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दीपोत्सव मानकरी शरद पाटील, जोतिबा फगरे, ऍड नामदेव मोरे, भाऊराव मोरे, गोपाळ पाटील, मोणापा भास्कर, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. किर्तन हभप प्रा.संदीप हातकर (आजरा) यांचं होईल. 7 मार्चला हभप मारुती पाटील (मंडोळी) यांचं काला किर्तन तसेच मंडपाभोवती प्रदक्षिणा होऊन महाप्रसादाने पारायणची सांगता होणार आहे.
तरी तीन दिवस हा अध्यात्मिक सोहळा साजरा होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पारायण मंडळातर्फे करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta