
बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील तीर्थ क्षेत्र यडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात आज होणाऱ्या नूतन राजगोपुर उद्घाटन, कळसारोहण व महाकुंभाभिषेक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आगमन झालेले भारताचे माननीय उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे बेळगावच्या सांबरा विमानतळावर गौरवपूर्वक स्वागत करण्यात आले.
यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, महापौर मंगेश पवार, प्रादेशिक आयुक्त जानकी के.एम. आणि जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यावेळी उपस्थित राहून उपराष्ट्रपतींचे स्वागत केले.
Belgaum Varta Belgaum Varta