Thursday , March 5 2026
Breaking News

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता थेट दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.
या कारवाईच्या निषेधार्थ बापट गल्लीतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत आंदोलन केले. अचानक करण्यात आलेल्या तपासणीमुळे आणि तात्काळ दंड आकारण्याच्या भूमिकेमुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
व्यापाऱ्यांनी नवीन व्यापारी परवाने काढण्यासाठी तसेच जुन्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी असलेली प्रक्रिया किचकट असल्याचे सांगितले. ही प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच परवाने नूतनीकरणासाठी योग्य असा अवधी देण्यात यावा, अशी विनंतीही करण्यात आली.
घटनास्थळी उपस्थित पालिका कर्मचाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर व्यापाऱ्यांना परवाने नूतनीकरणासाठी काही कालावधी देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर पालिका कर्मचारी तेथून निघून गेले.
या घटनेमुळे बापट गल्ली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

कावळेवाडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ व भजनी मंडळातर्फे दरवर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *