
चिक्कोडी : येडूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री एम. बी. पाटील यांनी चिक्कोडी जिल्ह्याच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला. याचवेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारचे परराष्ट्र धोरण आणि राज्यातील भाजप नेत्यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली.
येडूर येथील स्वामीजींच्या संरक्षण मागणीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट करत एम. बी. पाटील यांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा केवळ माध्यमांपुरत्या मर्यादित असल्याचे सांगितले. केपीएससी घोटाळ्याची चौकशी करण्याचे आश्वासन देतानाच त्यांनी फोन टॅपिंगचे आरोप फेटाळून लावले. आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या मुद्द्यावर केंद्राने अधिसूचना काढली नसून भाजप खासदार यावर बोलण्यास घाबरत असल्याची टीका त्यांनी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेद्र यांना स्वतःच्या पक्षातच कोणाचा पाठिंबा नसून ज्येष्ठ नेत्यांचा त्यांना विरोध आहे, असे नमूद करत एम. बी. पाटील यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणामुळेच रुपयाचे मूल्य घसरल्याचा आरोप केला.
Belgaum Varta Belgaum Varta