Saturday , March 14 2026
Breaking News

बेकायदेशीर शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

Spread the love

 

बेळगाव : ​बेळगावमध्ये बेकायदेशीर शस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याच्या आरोपाखाली माळमारुती पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

बेळगाव शहरात सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरित्या घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी तसेच सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी नुकतेच कणबर्गी येथील रहिवासी गंगाराम कुळ्ळन्नावर नामक तरुणाला माळ मारुती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून शस्त्र देखील हस्तगत करण्यात आले आहे. गेल्या महिनाभरात केवळ माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ गुन्हे नोंद झाले असून संपूर्ण शहरात एकूण ३५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
​शहरातील चाकू हल्ला आणि तत्सम हिंसक घटना रोखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. नागरिकांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता असून अशा कृत्यांमध्ये सामील असलेल्या व्यक्तींविरुद्ध ‘रौडीशिटर’ उघडला जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिला आहे.​बेळगाव पोलिसांनी सुरू केलेल्या या विशेष कारवाईमुळे आता शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कपिलेश्वरी-माळी यांचा प्रगतिशील लेखक संघातर्फे सत्कार

Spread the love  बेळगांव : बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या राष्ट्रीय सहकोषाध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल नितीन कपिलेश्वरी व मंडळाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *