Friday , June 26 2026
Breaking News

तालुका ब्लॉक काँग्रेस प्रचार समिती अध्यक्षपदी शेंडूरच्या संजय कांबळेंची निवड

Spread the love

 

बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

निपाणी (वार्ता) : निपाणी तालुका ब्लॉक काँग्रेस प्रचार समिती अध्यक्षपदी संजय कांबळे-रासाई शेंडूर, उपाध्यक्षपदी बाबासाहेब किल्लेदार-अक्कोळ व महिला अध्यक्षपदी कल्पना पुजारी यांची निवड करण्यात आली. ही निवड चिक्कोडी जिल्हा काँग्रेस आणि बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दिवंगत आमदार रघुनाथराव कदम, काकासाहेब पाटील व मान्यवर नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली संजय कांबळे यांनी काँग्रेसमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. शिवाय ग्रामीण भागात पक्षाच्या बळकटीसाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे. नूतन सर्व पदाधिकाऱ्यांचा येथे आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. कांबळे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून या पुढील काळात काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
चिक्कोडी जिल्हा काँग्रेस आणि बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी, कार्यकर्त्यांनी एक संघपणे राहून भविष्यातील निवडणुकीसाठी योगदान दिले पाहिजे. त्यासाठी सर्व नेते मंडळी कार्यकर्त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
निवडी प्रसंगी चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, सुजय पाटील, बेडकीहाळ भाग काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, रामचंद्र निकम, किरण पाटोळे, दीपक सावंत, बाळासाहेब कमते, अस्लम शिकलगार, झाकीर कादरी, नामदेव धोंडफोडे, अशोक लाखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. अवधूत गुरव यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

अंमली पदार्थामुळे कुटुंबासह समाज उध्वस्त पोलीस उपाधीक्षक गोपालकृष्ण गौडर

Spread the love  अंमली पदार्थ विरोधी जनजागृती निपाणी (वार्ता) : अंमली पदार्थांचे व्यसन केवळ एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *