Friday , June 26 2026
Breaking News

अभिनेते, व्याख्याते नंदकुमार गोरूले यांची उद्या येळ्ळूरच्या जाहीर सभेत तोफ धडाडणार

Spread the love

 

बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी व सीमाभागातील मराठी भाषेचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या माध्यमातून होणाऱ्या मराठी सन्मान यात्रेची पहिली जाहीर सभा रविवार दिनांक १५ मार्च रोजी सायंकाळी ७- ३० वाजता महाराष्ट्र चौक येळ्ळूर येथे आयोजित केली आहे.

या सभेला प्रमुख वक्ते म्हणून अभिनेते, लेखक, कट्टर शिवसैनिक नंदकुमार गोरूले यांची तोफ धडाडणार आहे, भारदस्त आवाज आणि अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे ते समोरच्या श्रोत्यांना खिळवून ठेवतात
दरम्यान ठीक ४.०० वाजता राजहंसगड येथून या मराठी सन्मान यात्रेची सुरुवात होवून सुळगे (येळ्ळूर), अवचारहट्टी, देवगण हट्टी, मांसगौंड हट्टी, ब्रम्हदेव हट्टी, धामणे परत येळ्ळूर येथे मोटरसायकल रॅलीचे आगमन होणार आहे, त्यानंतर महाराष्ट्र चौक येथे जाहीर सभा होणार आहे.
या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे जेष्ठ नेते माजी एपिएमसी सदस्य वामनराव पाटील हे राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून अभिनेते शिवसैनिक नंदकुमार गोरूले तसेच प्रमुख अतिथी म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे ऍड एम. जी. पाटील, युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, गोपाळराव पाटील, धामणे महाराष्ट्र एकीकरण समितीचे यल्लापा रेमाणाचे, धामणे ग्रामपंचायत अध्यक्ष पंडित पाटील, येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे दत्ता उघाडे, दुध्दाप्पा बागेवाडी, प्रकाश अष्टेकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी माय मराठीच्या सन्मानसाठी आयोजित केलेल्या केलेल्या या लढ्यात सर्व मराठी जनतेने सहभागी होऊन हा लढा यशस्वी करण्याचे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती म. ए. समितीची उद्या महत्वपूर्ण बैठक

Spread the love  बेळगाव : 29 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *