Sunday , August 30 2026
Breaking News

खानापूरमध्ये U-14 ऑक्शन क्रिकेट स्पर्धा; किरण जाधव – विमल फाउंडेशन पहिले फ्रँचायझी मालक

Spread the love

 

खानापूर : साई स्पोर्ट्स अकॅडमी, खानापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या U-14 ऑक्शन बेस्ड क्रिकेट स्पर्धेसाठी श्री. किरण जाधव – विमल फाउंडेशन सेंटर ऑफ एक्सलन्स यांनी पहिले फ्रँचायझी मालक म्हणून सहभाग नोंदवला असल्याची घोषणा आयोजकांनी केली आहे.

विमल फाउंडेशनच्या माध्यमातून किरण जाधव यांनी नेहमीच उत्कृष्ट क्रीडाभावना जपत बेळगाव परिसरातील प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन व पाठबळ देण्याचे काम सातत्याने केले आहे. त्यामुळे या स्पर्धेला त्यांचा सहभाग लाभणे ही क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाची बाब मानली जात आहे.

या ऑक्शन बेस्ड स्पर्धेमुळे १४ वर्षांखालील तरुण क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा दाखवण्याची तसेच लीग पद्धतीच्या स्पर्धेचा अनुभव घेण्याची उत्तम संधी मिळणार आहे.

तरुण क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देत क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल श्री. किरण जाधव आणि विमल फाउंडेशनचे आयोजकांनी आभार मानले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

श्रावण मासानिमित्त शिवबसव नगरमधील जोतिबा मंदिरात ३० ऑगस्ट रोजी केदार विश्वशांती यज्ञ

Spread the love  बेळगाव : शिवबसव नगर येथील श्री जोतिबा मंदिरात श्रावण मासानिमित्त मंदिर व्यवस्थापन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *