Saturday , March 14 2026
Breaking News

दक्षिणकाशी श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे मदतीचा हात

Spread the love

 

बेळगाव : काही दिवसापूर्वी खानापूर तालुक्यातील सिंगिंनकोप येथील रहिवासी स्वाती संतोष कुंभार यांचे कौलारू घर आग लागून भस्मसात झाले होते. या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य, जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या होत्या त्यामुळे कुंभार कुटुंबीयांचा संसार अक्षरशः उघड्यावर पडला होता. अशावेळी दक्षिणकाशी श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट मदतीला धावून येत माणुसकीचे दर्शन घडविले आहे. श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे स्वाती कुंभार यांना संसारासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू साहित्य आणि आर्थिक मदत देऊन दिलासा देण्यात आला. अचानक लागलेल्या आगीमुळे उध्वस्त झालेल्या कुंभार कुटुंबीयांना या मदतीमुळे धैर्य मिळाले आहे. शनिवार दिनांक 14 मार्च रोजी ही मदत स्वाती कुंभार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली असून यावेळी श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्टचे अभय लगडे, रमेश देसुरकर, अविनाश खानुकर, प्रसाद बाचोळकर, कृष्णा कुंभार उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

खानापूरमध्ये U-14 ऑक्शन क्रिकेट स्पर्धा; किरण जाधव – विमल फाउंडेशन पहिले फ्रँचायझी मालक

Spread the love  खानापूर : साई स्पोर्ट्स अकॅडमी, खानापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *