Wednesday , March 4 2026
Breaking News

जायंट्सची राज्यस्तरीय परिषद सोमवारी

Spread the love


बेळगाव : जायंट्स वेल्फेअर फौंडेशन या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेच्या शाखा क्रमांक सहाची राज्यस्तरीय परिषद सोमवार दिनांक 11 एप्रिल रोजी संपन्न होत आहे
एस. पी. एम. रोडवरील शिवम हॉल (प्रकाश टॉकीज शेजारी) येथे होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन सकाळी साडेनऊ वाजता मराठा मंदिराचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक श्री. आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते होणार आहे.
या परिषदेत कर्नाटकाच्या 5 युनिटमध्ये येणाऱ्या बेळगाव, हुबळी, घटप्रभा, मुनवळळी, उडपी, कारवार, ब्रह्मावर, अंकोला येथील वीसहून अधिक ग्रुपचे सभासद सहभागी होणार आहेत.

दुपारच्या सत्रात जायंट्स वेल्फेअर फौंडेशनच्या जागतिक चेअरमन श्रीमती शायना एन सी यांच्या हस्ते विभागीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जायंट्स फेडरेशन सहाचे अध्यक्ष अनंत जांगळे राहणार आहेत, अशी माहिती जायंट्स फेडरेशन सचिव अनंत लाड यांनी दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *