Sunday , April 5 2026
Breaking News

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी शनिवारी जनजागृती सभा

Spread the love

 

बेळगाव : सायबर गुन्हेगारांकडून ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत असून यावर जनजागृती करणे व ज्येष्ठ नागरिकांनी कोणती सावधानता बाळगावी यासंदर्भात बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटी व पोलीस आयुक्त कार्यालय यांच्यावतीने शनिवार दि. 28 रोजी जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार पेठ टिळकवाडी येथील सामर्थ्य मंदिराच्या सभागृहात (बालिका आदर्श विद्यालयाच्या जवळ) सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या जनजागृती सभेत पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे व सायबर गुन्हा शाखेचे सहायक पोलिस आयुक्त श्री मंतेरो मार्गदर्शन करणार आहेत. तरी ज्येष्ठ नागरिकांनी या सभेस वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष विश्वास धुराजी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षणातील ए.आयवर विचारमंथन

Spread the love  मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या प्रा. प्रशांत ढोपे यांचा शिक्षकांशी परिसंवाद बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *