Sunday , April 5 2026
Breaking News

सीमाप्रश्न : पत्रकार संघातर्फे रविवारी मराठी भाषिकांची बैठक

Spread the love

 

 

बेळगाव : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा (क्रमांक ४/२००४) दि. २९ मार्च २००४ रोजी राज्यघटनेच्या अनुच्छेद १३१ (ब) अन्वये सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. पण २२ वर्षे झाली तरी त्याची सुनावणी सलग होऊ शकली नाही. सदर सुनावणी लवकरात लवकर जलद गतीने करावी, अशी विनंती बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सरन्यायाधीशांना करण्यात येणार आहे. यासाठी त्यांना सीमा भागातील मराठी भाषिकांचे एक लाख सह्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी रविवार दि. २९ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ) खानापूर रोड येथे मराठी भाषिकांची बैठक बोलाविण्यात आली आहे. सर्वांनी उपस्थित राहून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर व कार्यकारिणीने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षणातील ए.आयवर विचारमंथन

Spread the love  मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या प्रा. प्रशांत ढोपे यांचा शिक्षकांशी परिसंवाद बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *